SSC HSC Result 2026 : दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता

0
SSC HSC Result 2026 : दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता
SSC HSC Result 2026 : दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता

नगर : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (10th and 12th Grade Students) अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण दहावी-बारावीचा निकाल (SSC HSC Result 2026) हा उशिरा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचाही यात समावेश होता. या आंदोलनाचा दहावी-बारावीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा निकाल लांबणीवर (Result Postponed) जाऊ शकतो.

नक्की वाचा: उद्धव ठाकरेंची मध्यरात्री भेट घेण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले की...

शिक्षण मंडळाची बढती आणि बदलीवरून वाद (SSC HSC Result 2026)

बोर्डाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे परिक्षांचे निकाल लावण्याचं काम संध्या बंद आहे. शिक्षण मंडळाची बढती आणि बदली दोन वर्षांवरुन चार ते सहा वर्षांवर नेल्याने कर्मचारी संतप्त झाले आहे.त्यामुळे २८ एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

अवश्य वाचा: लाडक्या बहिणींना मार्चचा हफ्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर…

राज्यातील नऊ विभागात लाक्षणिक कामबंद आंदोलन (SSC HSC Result 2026)

राज्य शिक्षण कर्मचारी संघटनेला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याने विरोध दर्शवण्यात आला आहे. सध्या कर्मचाऱ्यांकडून राज्यातील नऊ विभागात लाक्षणिक कामबंद आंदोलन सुरु आहे. त्यामुळेच याचा फटका थेट दहावी-बारावीच्या निकालावर होऊ शकतो,असं बोर्ड कर्मचारी महासंघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल सरोदे यांनी सांगितले आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र,आता या आंदोलनामळे हा निकाल लांबणीवर जाणार असल्याचे दिसत आहे. मात्र बोर्डाकडून अजून निकालाच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.