
State-Level Competition : नगर : शहरातील अनुराधा रत्नेश मिश्रा (Anuradha Mishra) यांनी लासलगाव (जि. नाशिक) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत (State-Level Competition) दमदार कामगिरी करत तीन सुवर्ण पदकांची (Gold Medal) कमाई केली आहे. पॉवरलिफ्टिंग, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या तिन्ही प्रकारांत त्यांनी अव्वल स्थान पटकावत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.
नक्की वाचा : दारूच्या नशेत मुलानेच केला बापाचा खून; राहाता येथे घडली घटना

राज्य पातळीवरही केले आपले वर्चस्व सिद्ध
अनुराधा मिश्रा यांनी यापूर्वीही आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश मिळवले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे त्यांनी राज्य पातळीवरही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या स्पर्धेत बेंच प्रेस प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत अनुराधा मिश्रा यांनी ‘स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र 2026’ ही मानाची ट्रॉफीही पटकावली. अत्यंत चुरशीच्या आणि काट्याच्या स्पर्धेत त्यांनी तब्बल 350 किलोपर्यंत वजन उचलत आपले शारीरिक सामर्थ्य आणि तांत्रिक कौशल्य सिद्ध केले. त्यांच्या या कामगिरीने उपस्थित प्रेक्षक आणि क्रीडाप्रेमींना थक्क केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव (State-Level Competition)
या उल्लेखनीय यशामागे त्यांना महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते तुषार दारकर, सचिव संतोष शिंदे आणि राष्ट्रीय पंच निशा शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच अनुराधा मिश्रा या सावेडी येथील ‘जिम स्ट्राईकर’मध्ये प्रशिक्षक स्वप्निल मंडलिक यांच्या देखरेखीखाली नियमित सराव करतात. शिस्तबद्ध प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी केवळ राज्य पातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून तसेच सामाजिक व विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


