Murder Case : दारूच्या नशेत मुलानेच केला बापाचा खून; राहाता येथे घडली घटना

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तत्काळ संशयित आरोपीला ताब्यात घेतले आ

0
Murder Case : दारूच्या नशेत मुलानेच केला बापाचा खून; राहाता येथे घडली घटना
Murder Case : दारूच्या नशेत मुलानेच केला बापाचा खून; राहाता येथे घडली घटना

Murder Case : राहाता : दारूच्या नशेत मुलाने बापाच्या डोक्यात फरशी टाकून ठार केल्याचा प्रकार राहाता येथे घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बापाची हत्या (Murder) करणाऱ्या मुलाला पोलिसांनी तत्काळ जेरबंद (Arrested) केले आहे सचिन खैरे असे संशयित आरोपीचे (Suspect) नाव असून उत्तम खैरे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नक्की वाचा : जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया : डॉ. उद्धव नाईक

घरातील वातावरण तणावपूर्ण

राहाता शहरातील घोलप मंगल कार्यालय शेजारील परिसरात राहणाऱ्या मुलाने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली असून शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी सचिन हा आपल्या वडील उत्तम खैरे यांना वारंवार मारहाण करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. कुटुंबातील वाद आणि सततचा त्रास यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण असल्याचीही माहिती समोर येत आहे. शुक्रवारी (ता. २४) संध्याकाळच्या सुमारास, संशयित आरोपी सचिन खैरे हा दारूच्या नशेत होता. यावेळी त्याने संतापाच्या भरात वडील उत्तम खैरे यांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केली. या भयानक प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी (Murder Case)

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ राहाता पोलीस ठाण्यात संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक लेंडे व कोमल कुमावत यांनी घटनास्थळाची पाहणी करून तत्काळ आरोपी सचिन खैरे याला ताब्यात घेतले आहे. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी राहाता पोलिसांकडून तपास सुरू असून, नेमके कारण काय याचा शोध घेतला जात आहे. कुटुंबातील वाद, दारूचे व्यसन आणि सततचे भांडण हे या घटनेमागील कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.