Unfortunate Death : मजले चिंचोली येथील तरुणाचा एसआरपीएफ भरतीदरम्यान दुर्दैवी मृत्यू

Unfortunate Death : मजले चिंचोली येथील तरुणाचा एसआरपीएफ भरतीदरम्यान दुर्दैवी मृत्यू

0
Unfortunate Death : मजले चिंचोली येथील तरुणाचा एसआरपीएफ भरतीदरम्यान दुर्दैवी मृत्यू
Unfortunate Death : मजले चिंचोली येथील तरुणाचा एसआरपीएफ भरतीदरम्यान दुर्दैवी मृत्यू

Unfortunate Death : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील मजले चिंचोली गावातील २८ वर्षीय बाळकृष्ण गंगाधर कदम यांचा राज्य राखीव पोलीस बल (SRPF) भरती प्रक्रियेदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. गोंदिया येथे सुरू असलेल्या भरतीमध्ये धावण्याच्या चाचणीदरम्यान दरम्यान ही घटना घडली.

हेही वाचा :  जनगणनेच्या कामासाठी महानगरपालिकेकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुरू

उपचारापूर्वीच मृत्यू

माहितीनुसार, धावत असतानाच बाळकृष्ण कदम यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थित अधिकाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

नक्की पहा : तिशीनंतर आपण जगासाठी धावतो, पण स्वतःच्या शरीराचं काय?

गावावर शोककळा (Unfortunate Death)

या घटनेमुळे चिंचोली गावावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळकृष्ण कदम हे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगून होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.