Temple : खांडगाव येथील कोंगजाई देवी नूतन मंदिराचे लोकार्पण

0
Temple : खांडगाव येथील कोंगजाई देवी नूतन मंदिराचे लोकार्पण
Temple : खांडगाव येथील कोंगजाई देवी नूतन मंदिराचे लोकार्पण

Temple : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव येथील ग्रामदैवत कोंगजाई देवीचे मूळ मंदिर गावालगतच्या पश्चिम दिशेला ऊंच डोंगरावर असून गावात असलेल्या (गावठाणे) मंदीराचा लोकार्पण सोहळा अहिल्यानगर येथील सुनील जोशी गुरुजी आणि सहकारी यांच्या वेदशास्त्र मंत्रौच्चाराने पुण्याह वाचन, देवता स्थापना, देवींच्या मूर्तीस जलाधिवास, धन्याधीवास, अग्नी स्थापना, प्रतिष्ठा होम, पूर्णाहुती, स्थिर लग्न, देवींच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा, नवचंडी पाठ, कलशारोहन, बलिदान,महाआरती, असे सलग तीन दिवस दिनांक २३ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ रोजी विधीवत सोहळा पार पडला.

हेही वाचा : मजले चिंचोली येथील तरुणाचा एसआरपीएफ भरतीदरम्यान दुर्दैवी मृत्यू

कलशारोहण व प्राण प्रतिष्ठा

बालयोगी शिष्य केशवदास महाराज यांनी कलशारोहण व देवींच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. अखेरच्या दिवशी नामदेव महाराज येळपने यांचे हरिनाम संकीर्तन पार पडले. महाप्रसादाने लोकार्पण सोहळा संपन्न झाला. खांडगावचे नागरिक निवृत्त ग्रामविकास अधिकारी मारूती नारायण इंगळे यांनी देवीचे गावठाणे मंदिराचा जीर्णोद्धार करून नविन मंदिर बांधण्याचा संकल्प पुर्ण केला. मंदिरासाठी पोपट नारायण इंगळे यांनी भूदान केले. हा सोहळा संपन्नतेसाठी संपुर्ण इंगळे परिवार व खांडगाव ग्रामस्थांनी साथ दिली.

नक्की पहा : गोदा ते नर्मदा जलयात्रा! अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी वर्षाचा खास उपक्रम

पंचक्रोशीतिल भाविक सहभागी (Temple)

मोडकळीला आलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार कसा असायला हवा, यांचे उत्तम उदाहरण म्हणजे कारागीर सुनिल धोत्रे यांनी अनेक पिढी टिकाऊ उत्कृष्ट मजबूत दगडी बांधकाम करून जीर्णोद्धाराचा नवीन आदर्श समाजासमोर ठेवला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने आप्तेष्ट, महिला, ग्रामस्थ, व पंचक्रोशीतिल भक्तगण सहभागी झाले होते.