Census : नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) वतीने जनगणनेच्या (Census) पहिल्या टप्प्यासाठी नियुक्त केलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सध्या शहरातील विविध केंद्रांवर सुरू आहे. या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, अनुपस्थित कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून नोटिसा (Notices Issued to Absent Employees) बजावण्यात येत आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर मनपा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साहात समारोप
आयुक्त डांगे यांनी सांगितले की,
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात एकूण ६८८ एचएलबी निश्चित करण्यात आले आहेत. या कामासाठी एकूण ८८३ प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना या प्रक्रियेची अचूक माहिती मिळावी यासाठी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जात असून, दररोज तीनशे प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. सध्या शहरातील विविध समित्यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या केंद्रांवर हे प्रशिक्षण सुरू आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्रशिक्षणासाठी १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती (Census)
सावेडी समितीअंतर्गत श्री समर्थ विद्यामंदिर येथे सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती होती, मात्र त्यापैकी १४ कर्मचारी अनुपस्थित होते. शहर समितीअंतर्गत अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूल येथे सुरू असलेल्या ५० जणांच्या प्रशिक्षणात दोन जणांनी दांडी मारली. बुरूडगाव समिती अंतर्गत आनंदधाम रस्त्यावरील जनशक्ती ज्युनियर कॉलेजमध्ये १०० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू असून त्यापैकी पाच जण अनुपस्थित होते. तसेच, झेंडीगेट समितीअंतर्गत न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये ५० जणांचे प्रशिक्षण सुरू असून, तेथेही काही कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशिक्षणाकडे पाठ फिरवणाऱ्या सर्व अनुपस्थित कर्मचाऱ्यांची यादी करण्यात आली असून, त्यांना नोटिसा काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे डांगे यांनी सांगितले.



