Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर मनपा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साहात समारोप

आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण; खेळ-कलांमुळे ताणतणाव कमी होतो मार्गदर्शन

0
Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर मनपा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साहात समारोप
Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर मनपा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साहात समारोप

Ahilyanagar Municipal Corporation : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) वतीने पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धा (sports competition) व सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साहात समारोप झाला. विजेत्या कर्मचाऱ्यांना पारितोषिक वितरण (Prize Distribution) करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धांमध्ये मनपा प्रभाग समिती क्रमांक दोनने उत्कृष्ट कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिपचा मान पटकावला.

नक्की वाचा : अहिल्यानगरात ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे जंगी स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश देत उत्साहात आगमन

Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर मनपा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साहात समारोप
Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर मनपा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साहात समारोप

डांगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण

या प्रसंगी आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मनपा क्रीडा अधिकारी फिलिप्स तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, “प्रत्येकाने आयुष्यात खेळ आणि कला जोपासली पाहिजे. दैनंदिन कामकाजामध्ये येणारा ताणतणाव कमी करण्यासाठी क्रीडा स्पर्धाअत्यंत उपयुक्त ठरतात. शरीर हीच आपली खरी धनसंपत्ती असून ते निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

खेळामुळे मानसिक ताकद वाढते (Ahilyanagar Municipal Corporation)

ते पुढे म्हणाले, “महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या पाहिजेत. काम करताना अनेक अडचणी येतात, परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे. खेळामुळे मानसिक ताकद वाढते आणि कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होते. नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून त्यांचे निराकरण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.
“महापालिका ही नागरिकांची संस्था आहे. त्यामुळे नागरिक आहेत म्हणून आपण आहोत हे लक्षात ठेवून काम केले पाहिजे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्यही चांगले राहते. कामाबरोबरच क्रीडा व इतर उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्यास जीवन अधिक आनंदी आणि निरोगी होते,” असेही त्यांनी सांगितले. भविष्यात क्रीडा स्पर्धांचे अधिक मोठ्या स्वरूपात आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

मनपा क्रीडा अधिकारी फिलिप्स यांनी स्पर्धांचा आढावा देताना सांगितले की, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
जनरल चॅम्पियनशिप: प्रभाग समिती क्रमांक दोन क्रिकेट स्पर्धा विजेता, घनकचरा विभाग उपविजेता, प्रभाग समिती क्रमांक तीन (झेंडी गेट) बुद्धिबळ स्पर्धा विजेते, शहर अभियंता मनोज पारखे व संकेत आढाव, उत्कृष्ट गोलंदाज सागर वैरागर, उत्कृष्ट फलंदाज सतीश वाघमारे याशिवाय विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
या क्रीडा स्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना, उत्साह आणि परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत झाली.