Cases Registered : पाथर्डी : पाथर्डी शहरात वाहतुकीस अडथळा (Obstruction of Traffic) निर्माण करणाऱ्या हातगाड्यांवर पोलिसांनी (Police) धडक कारवाई करत सहा जणांविरोधात गुन्हे दाखल (Cases Registered) केले आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.२५ एप्रिल) करण्यात आली असून, शहरातील प्रमुख रस्त्यांवरील हातगाडीवरील फळ विक्रेते, चप्पल विक्रेते व कपडे विक्रेत्यांच्या अतिक्रमणाविरोधात (Anti-Encroachment Drive) पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मछिंद्र नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, ते सध्या पाथर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असून ट्राफिक ड्युटी बजावत आहेत. दरम्यान, दि.२५ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ११ वाजता ते पोलीस हेड कॉन्स्टेबल ए.आर. शेख व पोलीस कॉन्स्टेबल संदीप बडे यांच्यासह खाजगी वाहनाने शहरात पेट्रोलिंग करत होते.
नक्की वाचा : अहिल्यानगर मनपा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साहात समारोप
ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी अपघाताचा धोका
सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास नाईक चौक ते अजिंठा चौक दरम्यान हातगाडी रस्त्यावर उभी करून फळ, चप्पल व कपडे विक्रीते असल्याचे निदर्शनास आले. या हातगाड्या ह्या ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी अपघाताचा धोका निर्माण करणारी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याबाबत हातगाडी चालकांना विचारणा केली असता त्यानी समाधानकारक उत्तर दिले नाही. यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ शेख यांनी दोन पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करून संबंधित हातगाडी रस्त्यावरून बाजूला करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
एकूण सहा विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल (Cases Registered)
या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फळ विक्रेते, चप्पल विक्रेते व कपडे विक्रेत्यांविरोधात एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अपघातांचा धोका टाळण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी व व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.



