Drawing Competition : तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात

0
Drawing Competition : तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात
Drawing Competition : तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात

Drawing Competition : पाथर्डी : कलेच्या उपासनेतूनच माणसाला जीवनातील खऱ्या आनंदाची प्राप्ती होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तरी कलागुण जोपासला पाहिजे. कला ही व्यक्तिमत्त्व घडविणारी शक्ती आहे. तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. असे प्रतिपादन पाथर्डीचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी (P I Vilas Pujari) यांनी केले. पाथर्डी पंचायत समितीच्या शिक्षण विभाग व तालुका कलाशिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री तिलोक जैन विद्यालयात (Shree Tilok Jain Vidyalaya) तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचा (Drawing Competition) पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

नक्की वाचा : अहिल्यानगर मनपा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साहात समारोप

अनेक मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी अनिल भवार, जिल्हा कलाशिक्षक संघटनेचे संस्थापक संजय पठाडे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक सुनिल दानवे, मंगेश काळे, मनीषा मिसाळ, डॉ. आरती जायभाय, नगमा खान आदी मान्यवर उपस्थित होते.

बाल कलाकार विद्यार्थ्यांचा सन्मान, शासकीय बाल चित्रकला स्पर्धेतील तालुकास्तरीय विजेत्यांना गौरविण्यात आले. तसेच राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी तालुका कलाशिक्षक संघटनेतर्फे श्री तिलोक जैन विद्यालयाचे कलाशिक्षक संजय गटागट यांना चालू वर्षाचा पाथर्डी कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच कलाशिक्षक बंडोपंत गोडगे, दिपक राठोड, संजय ससाणे यांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. आत्माराम दहिफळे यांचा पर्यवेक्षक पदावर रुजू झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अनिल भवार म्हणाले, (Drawing Competition)

विद्यार्थ्यांना सातत्याने संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.मोबाईलच्या आहारी न जाता विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वेळ देणे ही आजची गरज आहे.या दरम्यान विद्यार्थी व कलाशिक्षकांच्या चित्रकला व शिल्पकलेच्या उत्कृष्ट कृतींचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले होते.प्रास्ताविक आत्माराम दहिफळे, सूत्रसंचालन गणेश सरोदे तर आभार संजय ससाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर जगताप, लक्ष्मण देशमुख, मोहन दातीर, सतिश शिंदे, प्रवीण जोशी, मिलिंद गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

स्पर्धेतील गटानुसार विजेते:

पहिली ते दुसरी: अवंतिका जायभाय (प्रथम), ज्ञानेश्वरी पाचे (द्वितीय), अवनी शिरसाठ (तृतीय)

तिसरी ते चौथी: हंसिका आठरे (प्रथम), सिद्धार्थ एकसिंगे (द्वितीय), दुर्वा तुपे (तृतीय)

पाचवी ते सातवी: अमृता हिंगे (प्रथम), ऋतुजा पाटेकर (द्वितीय), श्रुती मिसाळ (तृतीय), अराध्या चांगुणे (चतुर्थ), मोहिनी घोरपडे (पाचवा)

आठवी ते दहावी: पूर्वी कदम (प्रथम), अथर्व जाधव (द्वितीय), किरण गर्जे (तृतीय), मानसी कदम, साक्षी वाबळे (उत्तेजनार्थ)

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी दिल्ली येथे निवड झालेल्या आरजू शेख, अथर्व जाधव, प्राची घाटूळ व तमन्ना शेख (श्री कानिफनाथ विद्यालय, जवखेडे खालसा) या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.