Amol Khatal : संगमनेर : सध्याच्या हवामान (Weather) बदलामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करून कमी पाण्यावरील पिके घेण्याचा सल्ला आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी खरीप हंगाम (Kharif season) पूर्व आढावा बैठकीतून शेतकऱ्यांना दिला आहे.
नक्की वाचा : त्र्यंबकेश्वर आणि चाैंडी येथून निघालेल्या दोन्ही जलयात्रा शिर्डीतून मार्गस्थ
खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठकीचे आयोजन
येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या वतीने विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शेतीमध्ये बदल स्वीकारणे गरजेचे (Amol Khatal)
आमदार खताळ म्हणाले की, दरवर्षी प्रत्येक विभागाच्या बैठका घेतल्या जात असतात. मात्र, त्या फक्त कागदावर घेतल्या जातात परंतू; त्या बैठका केवळ कागदोपत्री न राहता त्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या बदलत्या हवामानाचे संकट फक्त महाराष्ट्राच्या समोर नव्हे तर संपूर्ण जगासमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे पाण्याचे दीर्घ कालीन नियोजन करून शेतीमध्ये बदल स्वीकारणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धती सोबत आधुनिक तंत्रज्ञान, कमी पाण्यात येणारी पिके आणि पर्यायी शेती पद्धती स्वीकाराव्यात.
अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी, थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे. बियाणे, खते आणि कृषी औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता नकली बियाणे विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर तसेच खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी. मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला होता. यंदा एप्रिल महिन्यापासूनच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असून भविष्यात टँकर सुरू करण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
यांची उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार, तहसीलदार धीरज मांजरे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत गोमासे, गुलाब भोसले, भाजप किसान युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस रवींद्र थोरात, वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात, निमजचे प्रगतशील शेतकरी संतोष डोंगरे, अशोक कानवडे, रोहिदास गुंजाळ, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते



