Sangram Jagtap : नगर : गोमातेच्या रक्षणासाठी कायदे केले मात्र आजही गोहत्या (Cow Slaughter) थांबलेली नाही गो हत्या थांबायचे असेल तर त्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा ( मकोका )(MCOCA) सारखा व्हावा या व इतर मागण्यांचे निवेदन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना देण्यात आले.
नक्की वाचा: वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर गुन्हे दाखल
२१ हजार नगरकरांच्या सह्यांचे निवेदन
गोमातेच्या रक्षणासाठी शासनामार्फत विविध कायदे करण्यात आले राज्य मातेचा दर्जा देण्यात आला मात्र, त्याची अंमलबजावणी कठोरपणे होत नसल्याने संघटित पद्धतीने गोमातेची तस्करी-हत्या आजही होत आहे. हे चित्र उद्विग्न करणारे आहे. यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोकासारखा कठोर कायदा लोकसभेत संमत व्हावा. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, गोमातेचे संगोपन करणाऱ्यांना शासनामार्फत अनुदान देण्यात यावे, या सर्वांसाठी केंद्र शासनाने स्वतंत्र गोमंत्रालय स्थापन करावे आदी मागण्यांचे २१ हजार नगरकरांच्या सह्यांचे निवेदन तहसीलदार व नायब तहसीलदार यांना देण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पाच हजार तहसील कार्यालयांमध्ये निवेदन (Sangram Jagtap)
याप्रसंगी बापू ठाणगे यांनी गोमातेचे रक्षण करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून यासाठी हिंदू धर्मात धर्मीय पुर्ण देशभर एकवटले असून आज एकाच वेळी काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या पाच हजार तहसील कार्यालयांमध्ये निवेदन देण्यात येत आहे. ही ऐतिहासिक घटना आहे. संत मंडळींच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातून गो सेवक, गोप्रेमी मोठ्या संख्येने मागण्यांचे निवेदन देत आहेत. अहिल्यानगर मध्ये ही भिंगार, केडगाव, सावेडी व विविध उपनगरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे निवेदनावर सह्या केल्या आहेत. शहराप्रमाणेच जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये ही अशाच प्रकारचे निवेदन एकाच वेळी देण्यात येत आहे अशी माहिती दिली.
सावेडीतील दिनेश कुलकर्णी, भाजपा नेते महेंद्र गंधे, मिनल गंधे, नगरसेवक ऋग्वेद गंधे यांनी सहभागी वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांचे पूजन करून पदयात्रा मार्गस्थ झाली. यावेळी सर्व गोप्रेमीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
कलानगर चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे समर्थ विद्यामंदिर वरून धर्मवीर चौक येथे पदयात्रा भजन संकीर्तन करत आली तेथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला गोसेवकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व तेथून सर्व गो सेवक तहसीलदार कार्यालयात जमा झाले.
तहसीलदार, नायब तहसीलदार व अधिकाऱ्यांनी या पदयात्रेला कार्यालयाबाहेर सामोरे येत निवेदन स्वीकारले. याप्रसंगी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तहसीलदार अहिल्यानगर यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या.
याप्रसंगी बापू ठाणगे, डॉ.अर्जुन घुले, दिनेश खंडेलवाल, गोकुळ आठरे, सुरेखा सांगळे, भरत बोरुडे, योगेश जामगावकर, भैय्या काशिद, संजय जोशी, राजन साळुंकै, अजित कटारिया, अजिंक्य गायकवाड, भारत शिंदे, अनिकेत शिंदे, माऊली गोशाळेचे संचालक माऊली व परीवार, ब्रह्मचैतन्य गोशाळेचे गौतम कराळे व सहकारी, गुंडेगाव येथील गोशाळेचे भापकर विविध गोशाळेचे संचालक विविध मंदिरांचे पुजारी, व्यापारी प्रतिनिधी अबाल वृद्ध व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



