Deadly Attack : राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्तावर खूनी हल्ला; गुन्हा दाखल

Deadly Attack : राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्तावर खूनी हल्ला; गुन्हा दाखल

0
Deadly Attack : राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्तावर खूनी हल्ला; गुन्हा दाखल
Deadly Attack : राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्तावर खूनी हल्ला; गुन्हा दाखल

Deadly Attack : नगर : बोल्हेगाव परिसरातील राघवेंद्र स्वामी मंदिराच्या (Raghavendra Swamy Temple) विश्वस्तावर टोळक्याने कोयता आणि लाकडी दांडक्याने खूनी हल्ला (Deadly Attack) केल्याची घटना रविवारी (ता.२६) रात्री घडली. प्रकाश ज्ञानदेव सप्रे (वय ३९, रा. बोल्हेगाव रस्ता, सप्रे मळा, नागापूर) असे जखमी विश्वस्ताचे नाव असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मंदिरात रात्रीच्या वेळी एका मुलीसोबत बसलेल्या तरूणाला हटकल्याच्या रागातून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी (Police) दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

नक्की वाचा: वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर गुन्हे दाखल

मुलीसोबत बसलेला असताना विचारल्याचा राग

जखमी प्रकार सप्रे यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी (ता २७) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. ओम आप्पा कनगरे, अनुष आप्पा कनगरे, लकी कदम, ज्ञानु आमले, आदेश गायकवाड, आदित्य कवडे, सोनु कोलते (सर्व रा. बोल्हेगाव) व इतर तीन ते चार अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी प्रकाश सप्रे हे रात्री १० च्या सुमारास मंदिरात गेले असता, त्यांना त्या ठिकाणी ओम कनगरे हा एका मुलीसोबत बसलेला दिसला. सप्रे यांनी त्याला एवढ्या रात्री येथे काय करतो, असे विचारले. याचा राग मनात धरून ओम याने फोन करून आपल्या साथीदारांना बोलावून घेतले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार (Deadly Attack)

काही वेळातच अनुष कनगरे व इतर साथीदार तेथे आले. त्यांनी सप्रे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला. मंदिराचे रक्षक आणि नातेवाईक मदतीला धावून आल्याने सप्रे यांचा जीव वाचला. हल्लेखोर पळून जात असताना नागरिकांनी ओम आणि अनुष कनगरे या दोघांना जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.