Modi Script Competition | अहिल्यानगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात १ मे रोजी होणार अभिनव मोडी लिपी स्पर्धा

0

Modi Script Competition | नगर : महाराष्ट्र स्थापना व संग्रहालय स्थापना  दिनानिमित्त १ मे  २०२६ रोजी अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरांतील ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात मोडी लिपीची स्पर्धा (Modi Script Competition) आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संग्रहालयाचे अभिरक्षक डॉ. संतोष यादव यांनी दिली आहे. 

हे वाचा – ‘समता’ पतसंस्था सहकार विभागाच्या रडारवर; राहाता शाखेतील खात्यांची होणार पडताळणी

‘सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धे’चे आयोजन

ही स्पर्धा दोन विषयांवर होईल. यात ‘सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा’ सकाळी १० ते ११ वेळेत होईल. यात एक पान देवनागरी लिपीतील उतारा दिला जाईल. त्याचे मोडी लिपीत लिप्यंतर करावयाचे आहे. अक्षर चुका ग्राह्य धरल्या जातील. एका अक्षरास अनेक पर्याय असल्यास कोणतेही पर्याय वापरण्यास मुभा आहे. कागद आयोजक पुरविणार आहेत. स्पर्धकांना स्वत:चे पेन, बोरू, टाक, पेंसिल, कोड रब्बर, फूट पट्टी आणि राईटींग पॅड आणावयाचा आहे.

हेही वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना न्यायालयाचा दिलासा; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला

‘शिघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा’

स्पर्धेतील दुसरा विषय ‘शिघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा’ असा आहे. ही स्पर्धा सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वेळ होईल. यात १ शिवकालीन आणि १ पेशवेकालीन कागद दिला जाईल दोन्ही कागदांकरिता अर्धा-अर्धा तास दिला आहे. स्पर्धक तो एक तास स्वत:स हवा तसा वापरू शकतात. कागद आयोजक पुरवणार आहेत. स्पर्धकांना स्वत:चे पेन, बोरू, टाक, पेंसिल, कोड रब्बर, फूट पट्टी आणि राईटींग पॅड आणावयाचा आहे.

नक्की पहा : अहिल्यानगर शासकीय मेडिकल कॉलेजचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ नामकरण

प्रथम तीन विजेत्यांना उत्तम परितोषिक असून इतर सर्वांना स्पर्धे अंती मोडी सरावा करिता साहित्य दिले जाईल. स्पर्धा व निकाल प्रक्रियेचे सर्व हक्क आयोजकांकडे राहतील. स्पर्धेसाठी शुल्क आकारण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी अहिल्यानगरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात जवळील अहिल्यानगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज स्पर्धा ठिकाणी शुल्का सहीत सुपूर्द करायचा आहे. काही दिवसात येथे अप्लोड केला जाईल जो डाऊनलोड करून स्पर्धा ठिकाणी नोंदणी पक्की करावयाची आहे. प्रत्येक केंद्रावर स्पर्धक मर्यादा १०० ठेवण्यात आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here