
Sunetra Pawar : नगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ITAT मध्ये दिलासा मिळाला आहे. सुनेत्रा पवार यांना आयकर अपील न्यायाधिकरणाकडून दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांच्या विरोधातील आयकर कायद्याच्या कलम 153C अंतर्गत सुरू केलेली कार्यवाही रद्द करण्यात आली आहे.
हेही वाचा : ग्रामपंचायतीच्या ६४ जागांसाठी आज पोटनिवडणूक; २१ जागा बिनविरोध
नेमकं प्रकरण काय?
IT ने टाकलेल्या छाप्यात जितेन पुजारी यांच्याकडून ट्रायटन ग्रुपच्या डायऱ्या आणि वह्या जप्त करण्यात आल्या होत्या. ज्यात DD नावाच्या व्यक्तीच्या नावे 32 कोटींचे व्यवहार आयकर विभागाला आढळले, आणि त्या आधारे हे ‘DD’ हे अजित पवार असावेत ह्या तर्काच्या आधारे अजित पवार यांच्या उप्पन्नाचे मुल्यांकन करण्याची कारवाई IT विभागाने केली. मात्र सुनावणी दरम्यान ITAT समोर ‘DD’ म्हणजे अजित पवार हे सिध्द करण्यास इनकम टॅक्स विभाग अपयशी ठरल्याचे सुनावणी दरम्यान दिसून आले आणि ITAT ने अजित पवार यांना क्लिनचीट दिली आहे.
नक्की पहा : गुप्तधनाच्या लालसेचा खेळ? खड्ड्यामुळे गावात भीतीचे वातावरण
कायदेशीर कारवाई रद्द (Sunetra Pawar)
आयटीएटीने असा निष्कर्ष काढला की, आयकर अधिकाऱ्याने सादर केलेल्या पुराव्यांवरून त्याचे समाधान झाले असले तरी, जप्त केलेला माल आणि अजित पवार यांच्यात एक स्पष्ट आणि कायदेशीरदृष्ट्या टिकणारा दुवा प्रस्थापित करण्यात ते अयशस्वी ठरले. त्यानुसार, आयकर अधिकाऱ्याची कारवाई रद्द करण्यात आली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कायदेशीर वारसदार म्हणून सुनेत्रा पवार यांना ‘आयकर अपील न्यायाधिकरणा’कडून (ITAT) मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्या नावावर जोडलेले ३२.१४ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न आणि त्यावरील कायदेशीर कारवाई न्यायाधिकरणाने रद्द ठरवली आहे.


