Beating father and son : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील डोंगरगण परिसरातील गड मांजरसुंबा फाटा येथे एका दुकानासमोर पिता-पुत्रास मारहाण (Beating father and son) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : चाैंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार : देवेंद्र फडणवीस
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे
नामदेव आनंदा मते (वय ७४, रा. मते वस्ती, डोंगरगण) यांनी फिर्याद दिली आहे. अमोल बाळासाहेब मते (रा. इमामपूर, ता. अहिल्यानगर) व महेश बापू मते (रा. डोंगरगण) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
लोखंडी गज व लाकडी दांडक्याने मारहाण (Beating father and son)
शनिवारी (ता.२५) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. फिर्यादी नामदेव मते व त्यांचा मुलगा पांडुरंग हे झापवाडी (ता. नेवासा) येथून काम संपवून दुचाकीवरून घरी परतत होते. वांबोरी रस्त्यावरील आबासाहेब पटारे यांच्या दुकानासमोर ते थांबले असताना, संशयित आरोपी हे त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी तुला लई माज आला आहे, आज तुझा खेळच खल्लास करतो, असे म्हणत फिर्यादींना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी गजाने, लाकडी दांडक्याने पिता-पुत्रांना मारहाण करून जखमी केले. तसेच दुचाकीवर दगड आणि दांडके मारून नुकसान केले. पुन्हा नादी लागलात तर अंगावर डंपर घालून मारून टाकू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.



