Ladaki Bahin Yojna : लाडक्या बहिणींनो ई-केवायसी दुरुस्ती करून घ्या; उरले शेवटचे तीन दिवस

0
Ladaki Bahin Yojna : लाडक्या बहिणींनो ई-केवायसी दुरुस्ती करून घ्या; उरले शेवटचे तीन दिवस
Ladaki Bahin Yojna : लाडक्या बहिणींनो ई-केवायसी दुरुस्ती करून घ्या; उरले शेवटचे तीन दिवस

Ladaki Bahin Yojna : नगर : महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्याबाबतीत महत्वाची अपडेट आहे. या योजनेतील योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी सरकारने ई केवायसी प्रक्रिया सुरु केली होती. त्या ई केवायसी दुरुस्तीसाठी महिला व बाल विकास विभागानं दिलेली मुदतवाढ ३० एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना ई केवायसी दुरुस्त करुन घ्यायची आहे, त्यांच्यासाठी शेवटचे काही तास उरले आहेत.

हेही वाचा : राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्तावर खूनी हल्ला; गुन्हा दाखल

उरले शेवटचे काही दिवस (Ladaki Bahin Yojna)

लाडकी बहीण योजनेच्या नियम आणि अटींनुसार योग्य लाभार्थ्यांना योजनेचा लाभ व्हावा यासाठी ई केवायसी प्रक्रिया राबवली गेली होती. ई केवायसी प्रक्रिया करत असताना काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्यानं त्यांचा लाभ स्थगित झाला होता, त्यामुळं महिला व बालविकास विभागानं ई केवायसी दुरुस्तीसाठी यापूर्वी अनेकदा दुरुस्तीची संधी दिली होती आणि त्याला वेळोवेळी मुदतवाढ देखील दिली गेली होती. त्यानुसार आता ई केवायसी दुरुस्ती ३० एप्रिलपर्यंत करता येणार आहे. त्यामुळं ज्या महिलांना ई-केवायसी दुरुस्त करायची असेल त्यांनी ३० एप्रिलपूर्वी करणं आवश्यक आहे.

नक्की पहा : अहिल्यानगर शासकीय मेडिकल कॉलेजचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ नामकरण

लाडक्या बहिणींची संख्या घटली? (Ladaki Bahin Yojna)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाली होती तेव्हा लाभार्थी महिलांची संख्या २ कोटी ४१ लाखांच्या दरम्यान होती. मात्र, लाखो महिलांनी ई केवायसी प्रक्रिया केलेली नाही त्यामुळं त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. ज्या महिला केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना दरमहा १५०० रुपये दिले जातात.