RTE Admission Process : राहाता : तालुक्यातील खासगी शाळांमध्ये गरिबाच्या मुलांना प्रवेश मिळावा यासाठी सुरू असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या (RTE Admission Process) कागदपत्र तपासणी प्रकरणी पालकांना यासाठी कर्मचारीच सापडत नव्हते, याविषयी प्रसारमाध्यमांत बातम्या प्रसारित झाल्यानंतर प्रभारी गट शिक्षणाधिकारी राजेश पावसे यांची तातडीने बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी अभय कुमार वाव्हळ (Abhay Kumar Vavhal) यांना राज्य शिक्षण विभागाकडून (State Education Department) नियुक्तीसाठी ऑर्डर काढण्यात आली आहे,
नक्की वाचा : घुमटवाडी परिसरातील गहिनीनाथ देवस्थानजवळ आढळला संशयास्पद खड्डा; गावात भीतीचे वातावरण
शिक्षण विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता
बातम्या प्रसारित होताच जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पावशे यांच्याकडे या प्रकरणी अहवाल देखील मागवला होता. राहाता तालुका मोठा असून येथे मोठ्या प्रमाणात सरकारी शाळा, खासगी शाळा, मोठ्या शैक्षणिक संस्था आहे असे असतानाही देखील येथे प्रभारी गटशिक्षणाधिकारी होते. मुळात पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आकृतीबंधानुसार कुठल्याही प्रकारचे कर्मचारी या ठिकाणी नाही त्यामुळे शिक्षण विभागात ताण वाढला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अनेक कामे ऍडजस्टमेंट पद्धतीने सुरू (RTE Admission Process)
येथील अनेक कामे ऍडजस्टमेंट पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. आता अनेक वर्षानंतर राहाता गटशिक्षण अधिकारी म्हणून नवीन पदोन्नती मिळालेले अभय कुमार वाव्हळ यांना नियुक्ती मिळाली आहे, सध्या ते जिल्हा परिषद शिक्षण विभागात विस्तार अधिकारी म्हणून काम पाहत आहे, त्यांना आता पदोन्नती देण्यात आली आहे . थोड्या दिवसात ते चार्ज स्वीकारणार आहेत. त्यांच्यापुढे आता आरटीई. शिष्यवृत्ती परीक्षा, पट नोंदणी, शाळा तपासणी तसेच विद्यार्थी गुणवत्ता विकास आशा मोठ्या बाबी समोर असणार आहे .



