Amol Khatal : संगमनेर : अंगणवाडी सेविका (Anganwadi worker) व मदतनीस या केवळ कर्मचारी नसून त्या नव्या पिढीच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आई-वडिलांनंतर लहान मुलांचा सर्वाधिक जिव्हाळ्याने सांभाळ करणारा घटक म्हणजे अंगणवाडी सेविका आहेत. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात (Personality development) तसेच चांगल्या सवयी घडविण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी काढले.
नक्की वाचा : राहाता गटशिक्षणाधिकारी यांची बदली; अभय वाव्हळ यांची नियुक्ती
खताळ म्हणाले की
संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाच्या वतीने आयोजित बालविकास प्रकल्प विभागाच्या पोषण पंधरवाडा सांगता समारंभात ते बोलत होते. आमदार खताळ पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार महिला व बालकल्याण विभागासाठी सातत्याने कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बालकांचा सर्वांगीण विकास ही सामूहिक जबाबदारी (Amol Khatal)
पूर्वी अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता शासनाच्या माध्यमातून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुपोषण निर्मूलन, माता व बालकांचे आरोग्य सुधारणा आणि बालकांचा सर्वांगीण विकास ही सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका या शासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांसाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अनेक मान्यवर उपस्थित
या कार्यक्रमास गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश राऊत, आरोग्य समुपदेशक डॉ. प्रमोदिनी सावकार, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, उपाध्यक्ष संदीप घुगे,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, रोहिदास गुंजाळ बापू देशमुख, नितीन पानसरे, वकील अमित धुळगंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते



