Rajiv Gandhi Vima Yojana : राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजनेचे वितरण आता एका क्लिकवर 

0
Rajiv Gandhi Vima Yojana : राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजनेचे वितरण आता एका क्लिकवर 
Rajiv Gandhi Vima Yojana : राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजनेचे वितरण आता एका क्लिकवर 

नगर : आपल्या पाल्याच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाची ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ (Rajiv Gandhi Vima Yojana) किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहित आहे. पण बऱ्याचदा तांत्रिक अडचणींमुळे ही मदत मिळायला उशीर व्हायचा. मात्र,आता ही सिस्टिम पूर्णपणे बदलली आहे. आता एका क्लिकवर (One Click) अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा (Subsidy Amount Deposited Directly into Account) होणार आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात नेमक्या किती लाभार्थ्यांना याच लाभ मिळालाय ते जाणून घ्या… 

नक्की वाचा: शेतकऱ्याच्या बागेत पोपटांनी डाळिंब खाल्ली म्हणून कोर्टात १० वर्ष खटला चालला; नेमकं प्रकरण काय?

९५ लाभार्थ्याच्या खात्यावर ९१ लाखांचे अनुदान जमा (Rajiv Gandhi Vima Yojana)

अहिल्यानगर जिल्ह्यात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत गेल्या वर्षभरात ९५ लाभार्थ्याच्या खात्यावर ९१ लाखांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत ही योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत २६ लाभार्थ्यांचं २२ लाख ५ हजार ४८० रुपये अनुदान एका क्लिकवर वितरीत करण्यात आलय.अहिल्यानगर जिल्ह्यात ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ ही  शासनाच्या २१ जून २०२२ च्या सुधारित निर्णयानुसार, राबविली जाते. सुधारित शासन निर्णयानुसार, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळांसाठी ही योजना लागू आहे.

अवश्य वाचा: ‘लालपरीचा’ प्रवास आणखी सोयीस्कर होणार ; १ मे पासून एसटीचे ‘आपली बस,आपली सेवा’ अभियान सुरु

कोणकोणत्या अपघातासाठी अनुदान? (Rajiv Gandhi Vima Yojana)

शालेय विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दीड लाख रूपये, अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास १ लाख रुपये, कायमचा एक अवयव निकामी झाल्यास ७५ हजार रुपये, विद्यार्थ्याला अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये, विद्यार्थी आजारी पडून सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास दीड लाख रुपये, विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत खेळताना जखमी झाला, शाळेतील जड वस्तू पडून जखमी झाला, आगीमुळे किंवा विजेचा धक्का लागला किंवा वीज अंगावर पडून जखमी झाल्यास, झालेल्या प्रत्यक्ष खर्चाइतके म्हणजेच जास्तीत जास्त एक लाख रुपये अनुदान शासनातर्फे दिले जाते.

अहिल्यानगर जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ या वर्षात ९५ लाभार्थ्याच्या खात्यावर ९१ लाख ४३ हजार ८५० रुपये अनुदान वर्ग करण्यात आले. तसेच २० पात्र लाभार्थ्यांची २० लाख ४७ हजार रूपये अनुदानाची मागणी देखील शासनाकडे करण्यात आली आहे.