Legislative Council : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार

0
Legislative Council : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार
Legislative Council : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार

Legislative Council : नगर : महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. महाविकास आघाडीकडून या जागेसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा करत अंबादास दानवे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा : कलिंगड ठरतेय जीवघेणे; खरेदी करताना ‘या’ ३ गोष्टी नक्की तपासा

उद्या करणार अर्ज दाखल

आदित्य ठाकरे यांच्याकडून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर उद्या 11 वाजता दानवे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 एप्रिल शेवटचा दिवस आहे.

नक्की पहा : विधानपरिषदेसाठी विवेक कोल्हेंच्या नावाची घोषणा; कोल्हे समर्थकांकडून जल्लोष

आदित्य ठाकरे म्हणाले… (Legislative Council)

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.विधान परिषदेसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.