Santosh Deshmukh : नगर : सर्वांचं लक्ष लागून असलेल्या बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख विजयी झाले असून त्यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव केला आहे. धनंजय देशमुख कुटुंबाला मोठा धक्का बसला असून मस्साजोगच्या गावकऱ्यांनी त्यांच्या विरोधात कौल दिलाय. स्वरूपानंद देशमुख हे 92 मतांनी विजयी झालेत.
हेही पहा : विधानपरिषदेसाठी विवेक कोल्हेंच्या नावाची घोषणा; कोल्हे समर्थकांकडून जल्लोष
92 मतांनी पराभव
स्वरूपानंद देशमुख यांनी गावाच्या विकासावर तर मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या नावावर मते मागितली होती. यात अखेर गावकऱ्यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला . तब्बल 92 मतांनी स्वरूपानंद देशमुख विजयी झाले आहेत. मागच्यावेळी संतोष देशमुख यांनी त्यांचा 9 मतांनी पराभव केला होता. आता स्वरूपानंद देशमुख यांना एकूण 914 मते मिळाली आहेत. तर अश्विनी देशमुख 822 मते मिळाली. स्वरूपानंद देशमुख यांनी निकालानंतर संतोष देशमुख यांच्या आईची भेट घेतली आणि संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार केला अर्पण केला.
नक्की वाचा : कलिंगड ठरतेय जीवघेणे; खरेदी करताना ‘या’ ३ गोष्टी नक्की तपासा
धनंजय देशमुख म्हणाले… (Santosh Deshmukh)
धनंजय देशमुख म्हणाले, आज अनपेक्षित निकाल लागला आहे. गावासाठी जे अण्णांनी बलिदान दिलं आहे राहिलेले 18 महिने हे त्यांच्याच नावाने ही ग्रामपंचायत चालावी असं माझं मनोमन मत होतं. परंतु तसं झाले नाही. 16 महिन्यापासून जो न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई सुरू होती त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कुटुंबाचा सगळ्याचा वेळ गेल्यामुळे गावकऱ्यांसोबत जे काय रोजचे देवाण घेवाण संबंध होते ते कुठेतरी दुरावा निर्माण झाला. त्याचा फायदा निवडणुकीतील समोरच्या उमेदवाराला झाला आणि आमचा पराभव झाला. विजयी उमेदवाराला शुभेच्छा चांगल्या कामासाठी कायम सोबत राहणार आहे.



