MIDC Police Station : वृद्ध महिलेचे मनी मंगळसूत्र चोरणारा जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

MIDC Police Station : वृद्ध महिलेचे मनी मंगळसूत्र चोरणारा जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

0
MIDC Police Station : वृद्ध महिलेचे मनी मंगळसूत्र चोरणारा जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
MIDC Police Station : वृद्ध महिलेचे मनी मंगळसूत्र चोरणारा जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

MIDC Police Station : नगर : एमआयडीसी (MIDC) येथील आदर्श नगर परिसरात रात्रीच्या वेळी वृद्ध महिलेचे मनी मंगळसूत्र चोरी करणारा संशयित आरोपी एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police Station) बालिकाश्रम रस्ता परिसरातून ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडुन चोरी केलेला मुद्देमला हस्तगत करण्यात आला आहे. करण ऊर्फ गौतम औताडे (वय २२, रा. आदर्शनगर, एमआयडीसी, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे (Suspected Accused) नाव आहे.

नक्की वाचा: पाथर्डी येथे अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न; आई-वडील, पती व नातेवाईकांवर गुन्हा दाखल

संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार

एमआयडीसी येथील आदर्श नगर परिसरात 6 मार्च रोजी या फिर्यादी झोपेत असताना उशी खाली ठेवलेले डबेतून मनी मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या घटनेचा तपास करत असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा करण अवताडे यांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी केलेली मनी मंगळसूत्र यासह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ताब्यात घेतलेला संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात एमआयडीसी तोफखाना पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांच्या पथकाने केली कारवाई (MIDC Police Station)

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, सहाय्यक फौजदार राकेश खेडकर, पोलीस अंमलदार राजू सुद्रिक, सचिन आडबल नवनाथ दहिफळे, किशोर जाधव, अक्षय रोहोकले, सचिन हरदास, राहुल गुंडू, नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.