
Child Marriage : पाथर्डी : वडगाव (ता. पाथर्डी) येथे अल्पवयीन मुलीचे (Minor Girl) बळजबरीने लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी संबंधित मुलीच्या आई-वडील, पती तसेच इतर नातेवाईकांवर बालविवाह (Child Marriage) प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : पाईपलाईन रोड परिसरात बेकायदेशीर गॅस रिफिलिंग; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जबरदस्तीने विवाहास भाग पाडले
मिळालेलया माहितीनुसार, संबंधित मुलगी अल्पवयीन असताना तिच्या इच्छेविरुद्ध वडगाव येथील वाघेश्वर मंदिरात रात्रीच्या सुमारास विवाह लावण्यात आला. या विवाहासाठी आधीपासून नियोजन करण्यात आले होते. मुलीचा विरोध असतानाही तिला जबरदस्तीने विवाहास भाग पाडण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणांनी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, सुरुवातीला ठोस पुरावे न मिळाल्याने कारवाई होऊ शकली नव्हती. त्यानंतर पुन्हा नियोजन करून विवाह लावण्यात आल्याचा आरोप आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाण्याकडे वर्ग (Child Marriage)
काही काळानंतर संबंधित मुलीने मदतीसाठी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून तिला ताब्यात घेत सुरक्षित ठिकाणी हलविले. पुढे तिने शिरूर (पुणे) पोलीस ठाण्यात हजर राहून सविस्तर तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम मधील विविध कलमान्वये तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. मुलीकडचे सासरची मंडळी ही डोणगाव (ता. आंबड जि. जालना) येथील असून सध्या ते बाबुरावनगर शिरूर (ता.शिरूर जि.पुणे) येथे वास्तव्यास आहे.


