Chess Tournament : उपमहापौर धनंजय जाधव चषक जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेचे ३ मे ला आयोजन

निवड झालेल्या खेळाडूंची राज्य निवड चाचणी स्पर्धेची प्रवेश फी संघटनेमार्फत भरली जाणार

0
Chess Tournament : उपमहापौर धनंजय जाधव चषक जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेचे ३ मे ला आयोजन
Chess Tournament : उपमहापौर धनंजय जाधव चषक जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेचे ३ मे ला आयोजन

Chess Tournament : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेचे (Ahilyanagar Municipal Corporation) नवनिर्वाचित उपमहापौर धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांच्या नावाने जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेचे (Chess Tournament) आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आली असून ७, ९, १३ व १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी खुली आहे. नवनिर्वाचित उपमहापौरांनी महापालिकेमध्ये केलेल्या धडाकेबाज कामगिरीला सलाम म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी दिली.

नक्की वाचा : पाथर्डीतील पंचायत राज विभागातील उपअभियंत्यावर बोगस अपंग प्रमाणपत्राचा आरोप; चौकशीची मागणी

Chess Tournament : उपमहापौर धनंजय जाधव चषक जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेचे ३ मे ला आयोजन
Chess Tournament : उपमहापौर धनंजय जाधव चषक जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेचे ३ मे ला आयोजन

प्रत्येकी २ मुले व २ मुली राज्यस्तरावर जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व

ही स्पर्धा रविवार, (ता. ३) मे ला सकाळी ९.३० वाजता नगर येथील गायत्री मंगल कार्यालय, महाजन गल्ली येथे सुरू होणार आहे. स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंमधून अहिल्यानगर जिल्ह्याच्या मुलांचा व मुलींचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निश्चित करण्यात येणार आहे. अंतिम निकालानुसार प्रत्येकी २ मुले व २ मुली राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. निवड झालेल्या खेळाडूंची राज्य निवड चाचणी स्पर्धेची प्रवेश फी संघटनेमार्फत भरली जाणार असून राहण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक वयोगटातील पहिल्या पाच मुला-मुलींना “उपमहापौर धनंजय जाधव करंडक” देऊन गौरविण्यात येणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार (Chess Tournament)

ही स्पर्धा १ जानेवारी २००७ नंतर जन्मलेल्या (१९ वर्षांखालील) खेळाडूंसाठी खुली असून सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी बुद्धिबळ पट, सोंगट्या, जेवणाचा डबा व पिण्याचे पाणी सोबत आणणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी प्रवेश ऑनलाइन किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे स्वीकारले जात असून नोंदणीची अंतिम मुदत शनिवार, (ता. २) मे ला सायंकाळी ८.०० वाजेपर्यंत आहे.

आयोजकांकडून आवाहन

अधिक माहिती व नोंदणीसाठी यशवंत बापट (९३२६०९२५०१), पारूनाथ ढोकळे (९८५०७०४२६८), मनीष जसवानी (८८५५००२३३२), प्रशांत धंगेकर (९९२१३७७९८८), देवेंद्र ढोकळे (८७००४१२६३३) व चेतन कड (७२७६६७८८९३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावी: https:/ forms.gle/9Vxmik1irvbkcwwTA अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.