
Food and Drug Administration : नगर : सुमारे अडीच वर्षांपूर्वी झालेल्या सुपारी विरोधातील कारवाई प्रकरणी मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तत्कालीन सहआयुक्तांसह दोन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना राज्य सरकारने (State Government) निलंबित केले आहे. या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासनात (Food and Drug Administration) खळबळ उडाली आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये तत्कालीन सहआयुक्त भूषण मोरे, यांस आणखी दोन अधिकाऱ्यांचा (Food Safety Officer) समावेश आहे. या प्रकरणाला सहआयुक्त सोपान इंगळे यांनी दुजोरा दिला असून, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा: पाथर्डीत लाच घेताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सुपारीवर केली होतीमोठी कारवाई
मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुटे व बडे यांनी सुमारे अडीच विरोधात वर्षांपूर्वी सुपारी मोठी कारवाई केली होती. मात्र, पकडलेली सुपारी काही दिवसांनी सोडून दिली होती. या कारवाईच्या अंमलबजावणीबाबत सुरूवातीपासूनच विविध स्तरांतून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कर्तव्यात कसूर झाल्याचे निदर्शनास आल्याने कारवाई (Food and Drug Administration)
कारवाईदरम्यान नियमांचे पालन झाले का, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडली का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर प्रकरण गंभीर मानत राज्य सरकारने थेट हस्तक्षेप केला. प्राथमिक चौकशीत संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे निदर्शनास आल्याने ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी या कारवाईला स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून अपिल दाखल केले जाणार असल्याचे समजते.


