Brutal Murder नगर : अहिल्यानगर तालुक्यातील वाकोडी परिसरात एका तरूणाचा अत्यंत क्रूरपणे खून (Brutal Murder) करून त्याचा मृतदेह (Dead Body) पोत्यात भरून शेतात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिंगार कॅम्प पोलिसांनी (Bhingar Camp Police) याबाबत तपास करत दोन संशयितांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रसाद रोहीदास जाधव (वय ३९, रा. वाकोडी फाटा) असे मृत तरूणाचे नाव आहे.
नक्की वाचा: पाथर्डीत लाच घेताना दोन पोलीस रंगेहात पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
चौकशीदरम्यान दोघांची धक्कादायक कबुली
याप्रकरणी मृताच्या पत्नी अश्विनी जाधव यांनी बुधवारी (ता २९) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शुभम हरी भोसले (वय २०) आणि समाधान उर्फ बाळ्या रामदास सोनवणे (वय ४२, दोघे रा. वाकोडी फाटा) यांना अटक करण्यात आली आहे. प्रसाद जाधव हे २६ एप्रिल रोजी दुपारी न्यू आर्ट्स कॉलेज येथे पेपर देण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र ते परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. तपासादरम्यान बुरूडगाव रस्ता परिसरात प्रसाद यांच्यासोबत दोन संशयित दिसून आले. त्याआधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवत शुभम भोसले आणि समाधान सोनवणे यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी धक्कादायक कबुली दिली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
लाकडी दांडक्याने आणि दगडाने डोक्यावर वार करत खून (Brutal Murder)
२६ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बुरूडगाव ते बार्डी रस्त्यावर त्यांना एका व्यक्तीने दारूच्या नशेत शिवीगाळ केली. या प्रकारामुळे संतप्त होऊन त्यांनी त्या व्यक्तीला दुचाकीवर बसवून वाकोडी शिवारातील उसाच्या शेतात नेले. तेथे लाकडी दांडक्याने आणि दगडाने डोक्यावर व तोंडावर वार करत त्याचा खून केला. गुन्ह्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून शेतात टाकण्यात आला. तसेच मृताची दुचाकी सिना नदी पुलाजवळील झुडपात लपवून ठेवण्यात आली होती. संशयितांच्या कबुलीनुसार पोलिसांनी शोध घेतला असता वाकोडी शिवारातील गट क्रमांक १५८ मधील उसाच्या शेतात पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आला. भिंगार कॅम्प पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. घरापासून न्यू आर्ट्स कॉलेज पर्यंत तसेच इतर मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करत खुनाचा उलगडा केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



