Karjat Nagar Panchayat : कर्जत : कर्जत नगरपंचायतीमध्ये (Karjat Nagar Panchayat) गटनेते संतोष मेहेत्रे आणि उपगटनेते सतीश पाटील यांच्या अधिकारावरून वाद उफाळला आहे. वास्तविक पाहता यास नगराध्यक्षा (President) आणि उपनगराध्यक्ष पदाच्या बदलाची झालर आहे. मागील आठवड्यात २४ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) आणि काँग्रेस यांच्या १५ पैकी ९ नगरसेवकांनी उपगटनेते पाटील यांच्या पत्रावरून बैठक घेत गटनेते संतोष मेहेत्रे यांच्यावर अविश्वास दाखवत जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे गटनेता बदलण्याचा मागणी प्रस्ताव दाखल केला होता.
नक्की वाचा: पाथर्डीत लाच घेताना दोन पोलीस रंगेहात पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
५ मे रोजी बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना
तर गटनेते मेहेत्रे यांनी पाटील यांनी बोलावलेली बैठकच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असून उपगटनेते पद रद्द करण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले होते. या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या वादाची परिस्थिती पाहता बुधवार, दि २९ रोजी दुपारी साडे बारा वाजता जिल्हाधिकारी यांनी १५ नगरसेवकांची बैठक बोलावली होती. त्यानुसार कर्जतचे १५ नगरसेवक बैठकीस उपस्थित राहिले. सुनावणी सुरू असताना विद्यमान गटनेते मेहेत्रे यांच्या कायदेशीर सल्लागाराने आम्हांस आपले म्हणणे सादर करण्यासाठी थोडा अवधी मिळावा. तसेच उपगटनेते यांनी गटनेते बदलाबाबत जे कागदपत्रे सादर केली आहेत. त्याची प्रत मिळावी यासाठी वेळ मागितला असल्याची माहिती कर्जतच्या एका नगरसेवकाने दिली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने कर्जतच्या १५ नगरसेवकांना मंगळवार, दि ५ मे रोजी पुन्हा बैठकीस उपस्थित राहण्याबाबत सूचित केले आहे. त्यामुळे गटनेता बदलणार की? आहे तोच कायम राहणार यासाठी ५ मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गटनेता बदलासाठी राम शिंदे, रोहित पवार गट एकत्र (Karjat Nagar Panchayat)
कर्जत नगरपंचायतीच्या चार वर्षांच्या राजकारणात कोण मित्र आणि कोण विरोधक सांगता येणे कठीण जात असून माजी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर १५ पैकी ११ नगरसेवकांनी अविश्वास आणला होता. ४ नगरसेवक रोहित पवार यांच्याबरोबर कायम राहिले होते. आता गटनेता बदलासाठी रोहित पवार गटाचे ४ नगरसेवकांनी राम शिंदे गटास उघड मदत केल्याचे दिसत आहे. गटनेता बदलला तर उद्या विद्यमान नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या पदावर देखील गडांतर येऊ शकते अशी चर्चा कर्जतच्या स्थानिक राजकारणात दबक्या आवाजात सुरू आहे.



