Heatstroke : ‘असा’ करा उष्माघातापासून बचाव; आरोग्य विभागाने दिल्या दक्षतेच्या सूचना

0
‘असा’ करा उष्माघातापासून बचाव; आरोग्य विभागाने दिल्या दक्षतेच्या सूचना
‘असा’ करा उष्माघातापासून बचाव; आरोग्य विभागाने दिल्या दक्षतेच्या सूचना

Heatstroke : नगर : राज्यात सध्या तापमानाचा पारा वाढत असून भारतीय हवामानशास्त्र विभागाने काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. वाढत्या उन्हामुळे होणारा उष्माघात टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

नक्की वाचा : भोंदू गडगेला औषधे पुरवणारा प्लांट रडारवर; पोलिसांनी केली तपासणी

या गोष्टी पाळा

आरोग्य विभागाने नागरिकांना तहान लागली नसली तरीही सतत पाणी पिण्याचे आवाहन केले आहे. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. लिंबू पाणी, ताक, लस्सी, ओआरएस आणि हंगामी फळांचे रस यांचे सेवन करावे. बाहेर पडताना सुती आणि फिकट रंगाचे सैल कपडे वापरावेत तसेच डोके झाकण्यासाठी छत्री किंवा टोपीचा वापर करावा. विशेषतः दुपारी 12:00 ते 3:00 या वेळेत उन्हात बाहेर पडणे टाळावे. तसेच दुपारच्या वेळी कष्टाची कामे करणे, अनवाणी बाहेर जाणे किंवा जास्त उन्हात स्वयंपाक करणे टाळावे.

हेही पहा : तहानलेल्या माकडास आजींनी मायेने पाजले पाणी

ही आहेत लक्षणे (Heatstroke)

शरीराचे तापमान वाढणे, चक्कर येणे, मळमळणे, तीव्र डोकेदुखी, सतत होणारी उलटी किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या आजारी व्यक्तींनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती बेशुद्ध पडल्यास किंवा तिच्या शरीराचे तापमान खूप वाढल्यास त्वरित 108 किंवा 102 या क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधावा. डॉक्टरांची मदत येईपर्यंत संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी हलवावे आणि ओल्या कापडाने शरीर पुसून घ्यावे.