Rahata Crime News : पिंपरी निर्मळ परिसरात गर्भलिंग तपासणी; डॉक्टरसह दोन एजंट ताब्यात

संपूर्ण कारवाई पोलिसांनी अत्यंत गुप्ततेने पार पाडली

0
Rahata Crime News : पिंपरी निर्मळ परिसरात गर्भलिंग तपासणी; डॉक्टरसह दोन एजंट ताब्यात
Rahata Crime News : पिंपरी निर्मळ परिसरात गर्भलिंग तपासणी; डॉक्टरसह दोन एजंट ताब्यात

Rahata Crime News : नगर : राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरात निळवंडे कालव्या (Nilwande Canal) लगत एका ओसाड ठिकाणी असलेल्या एका घरात गर्भलिंग तपासणीच्या प्रकारावर पोलिसांनी छापा (Police Raid) टाकत एका डॉक्टरसह (Doctor) दोन एजंटला ताब्यात घेतले. या कारवाईत तपासणीसाठी आलेल्या महिलांनाही सुरक्षित ताब्यात घेण्यात आले असून, घटनास्थळावरून वैद्यकीय यंत्रसामग्रीसह विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.

नक्की वाचा: पाथर्डीत लाच घेताना दोन पोलीस रंगेहात पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी लोणी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती पवार यांच्या फिर्यादीवरून नेवासा तालुक्यातील डॉ.राहुल भणगे, एजंट अभिजीत भुसाळ यांच्या विरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी-निर्मळ पिंपरी रस्त्यालगत निळवंडे कालव्याच्या कडेला शेतातील दोन खोल्यांमध्ये हा प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यानुसार तात्काळ पथक नेमण्यात आले. श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

संपूर्ण कारवाई अत्यंत गुप्ततेने पार पाडली (Rahata Crime News)

छाप्यात निर्जन शिवारात उभारलेल्या दोन खोल्यांमध्ये गर्भलिंग तपासणीसाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन, मॉनिटर, बॅटरी वीजपुरवठा यंत्रणा, जेल, वैद्यकीय कागदपत्रे तसेच इतर उपकरणे आढळून आली. ही सर्व यंत्रसामग्री पोलिसांनी जप्त केली आहे.घटनास्थळी उपस्थित डॉक्टर, एजंट तसेच संबंधित महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, संपूर्ण कारवाई पोलिसांनी अत्यंत गुप्ततेने पार पाडली.

कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू

या प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून, या बेकायदेशीर प्रकारामागील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या कारवाई करण्यामध्ये लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक युवराज आठरे,पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल साईनाथ राशिनकर,शेवाळे,निलेश धातवड, सय्यद आदींनी मोलाची भूमिका बजावली.