Assault : तक्रार केल्याच्या रागातून मॅनेजरला मारहाण; तिघांविरूध्द गुन्हा

Assault : तक्रार केल्याच्या रागातून मॅनेजरला मारहाण; तिघांविरूध्द गुन्हा

0
Assault : तक्रार केल्याच्या रागातून मॅनेजरला मारहाण; तिघांविरूध्द गुन्हा
Assault : तक्रार केल्याच्या रागातून मॅनेजरला मारहाण; तिघांविरूध्द गुन्हा

Assault : नगर : एमआयडीसी परिसरातील (MIDC Area) एका कंपनीतील कामगाराबाबतची माहिती वरिष्ठांना दिल्याच्या कारणावरून कंपनीच्या व्यवस्थापकाला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी ठोकळ्याने मारहाण (Assault) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) मुख्य संशयित आरोपीसह दोन अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती

शिस्तभंगप्रकरणी दुसऱ्या विभागात केली होती बदली

मॅनेजर जितेंद्र कुमार हमविर सिंग (वय ३५, मुळ रा. उत्तरप्रदेश, हल्ली रा. नागापूर, एमआयडीसी) यांनी फिर्याद दिली आहे. महेश साहेबराव गायकवाड (रा. आगडगाव, ता. अहिल्यानगर) व दोन अनोळखीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी जितेंद्र कुमार एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. कंपनीतील पेन्ट शॉपजवळ महेश गायकवाड हा कर्तव्यावर असताना झोपलेला जितेंद्र कुमार यांना आढळला होता. याबाबतची माहिती त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. या माहितीनंतर व्यवस्थापनाने शिस्तभंग केल्याप्रकरणी महेश याची बदली कंपनीच्या दुसऱ्या विभागात केली होती.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

बदलीला जबाबदार असल्याचा राग धरुण मारहाण (Assault)

आपल्या बदलीला जितेंद्र कुमार जबाबदार असल्याचा राग मनात धरून महेश गायकवाड याने आपल्या दोन साथीदारांसह जितेंद्र कुमार यांना गाठले. एका कंपनीच्या समोर गाठून संशयित आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर जितेंद्र कुमार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.