Somnath Gharge : अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती

जिल्ह्यातील एका वरिष्ठ नेत्याकडे घार्गे यांच्या बदलीची मागणी केल्याची चर्चा

0
Somnath Gharge : अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती
Somnath Gharge : अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती

Somnath Gharge : नगर : अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांची आज (ता. ३०) बदली झाली आहे. त्यांच्या जागी मुम्मका सुदर्शन (Mummaka Sudarshan) यांची अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. घार्गे यांच्या बदलीची चर्चा मागील एका महिन्यापासून सुरू होती. अवघ्या एका वर्षात घार्गे यांनी बदली झाल्याने जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे.

नक्की वाचा : पिंपरी निर्मळ परिसरात गर्भलिंग तपासणी; डॉक्टरसह दोन एजंट ताब्यात

पोलीस प्रशासनात घार्गे यांच्याबाबत नाराजी

सोमनाथ घार्गे यांनी वर्षभरापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदभार स्वीकारल्यावर मोठे बदल करण्यास सुरूवात केली होती. त्यांच्या कारकिर्दीत गोवंशीय जनावरांच्या हत्येविरोधात कारवाई मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे समाजात त्यांच्या विषयी चांगली भावना झाली होती. मात्र, पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील आमली पदार्थ तस्करी प्रकरणात थेट जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्मचारीच दोषी आढळल्याने पोलीस प्रशासनात घार्गे यांच्याबाबत नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

एका वरिष्ठ नेत्याकडे घार्गे यांच्या बदलीची मागणी केल्याची चर्चा (Somnath Gharge)

अशातच अवैध कत्तलखान्यांवरील कारवाईमुळे विशिष्ट समाज नाराज होता. त्यांनी जिल्ह्यातील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याकडे घार्गे यांच्या बदलीची मागणी केल्याची चर्चा होती. या शिवाय कर्मचाऱ्यांच्या बदल्या, बडतर्फी आदी प्रकरणेही यामागे असल्याची चर्चा आहे. अशातच आज (ता. ३०) घार्गे यांची मुंबई येथील पोलीस मुख्यालयात बदलीचे आदेश निघाले. तर चंद्रपूर येथील पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगरमध्ये बदलीचे आदेशही निघाले. या बदलीमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठे बदल होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.