Juice Centre : श्रीगोंद्यात ज्युससाठी सडक्या फळांचा वापर; परप्रांतीय दुकानचालकाचे पलायन

0
Juice Centre : श्रीगोंद्यात ज्युससाठी सडक्या फळांचा वापर; परप्रांतीय दुकानचालकाचे पलायन
Juice Centre : श्रीगोंद्यात ज्युससाठी सडक्या फळांचा वापर; परप्रांतीय दुकानचालकाचे पलायन

Juice Centre : नगर : श्रीगोंदा शहरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. ‘फ्रेश ज्यूस’च्या नावाखाली सडलेली फळे वापरून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर संतापलेल्या ग्राहकांनी ज्यूस सेंटरवर धाव घेत दुकान उघडे पाडले आणि परप्रांतीय दुकानचालक घटनास्थळावरून पळून गेला.

हेही वाचा : त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे सचिव मनिष घाडगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू; संस्था कार्यालयात केला होता आत्महत्येचा प्रयत्न 

सडके आणि किडे पडलेले आंबे

श्रीगोंदा शहरात परप्रांतीय ज्यूस चालकांनी बसस्थानक रोडला ज्यूस सेंटर टाकली आहेत. तिथे काही तरुण आंबा ज्यूस पिण्यासाठी गेले असता त्यांना संशय आल्याने त्यांनी टोपली पाहिली. त्यात सडके आणि किडे पडलेले आंबे आढळले. तसेच अननस, चिकू, अंजीर, मोसंबी ही फळे देखील सुमार दर्जाची आणि खराब आढळली. त्यातून सडका भाग काढून ज्यूस तयार केला जात असल्याबाबत याचा जाब विचारला असता परप्रांतीय मालकाने अरेरावी केली. त्यानंतर परिस्थिती पाहून दुकान सोडून पळ काढला.

नक्की पहा : आमदार रोहित पवारांकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवास्थानांच्या कामाची पाहणी

प्रशासनाचे दुर्लक्ष (Juice Centre)

शहरात अनेक परप्रांतीय व्यावसायिक आपले व्यवसाय करत आहेत. मात्र, अन्न पदार्थ आणि पेय दुकान सुरू करताना श्रीगोंदा पालिका आणि अन्न प्रशासन यांचे संबंधीत दुकानावर नियंत्रण असणे आवश्यक असताना श्रीगोंद्यात वेगळेच चित्र दिसत आहे. शहरात मागील काही वर्षापासून अनेक ज्यूस सेंटर खुलेआम सुरू आहेत. संबंधित ज्यूस चालकाची या परिसरात दोन ते तीन दुकाने असल्याची शहरात चर्चा आहे.