Kharif Season Planning : अकोले : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी अधिकारी कार्यालय अकोले (Akole) यांच्यावतीने तहसील कार्यालयात खरीप हंगाम नियोजन (Kharif Season Planning) व आढावा बैठक आमदार डॉ. किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamte) यांच्या उपस्थितीत पार पडली. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत विविध कृषी योजनांचे नियोजन, पीक पद्धतीतील बदल आणि शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कृषी अधिकारी तसेच शेतकरी बांधव उपस्थित (Kharif Season Planning)
बैठकीदरम्यान पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करून योग्य पीक निवड, बियाण्यांची उपलब्धता, खत व्यवस्थापन तसेच जलसंधारणाच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. याशिवाय शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांच्यासह सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी सखी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. ही बैठक आगामी खरीप हंगाम अधिक यशस्वी करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



