Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा उद्या शाही विवाह सोहळा; जय्यत तयारी सुरु

0
Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा उद्या शाही विवाह सोहळा; जय्यत तयारी सुरु
Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा उद्या शाही विवाह सोहळा; जय्यत तयारी सुरु

Indorikar Maharaj : नगर : समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा संगमनेरमधील गुंजाळवाडी येथे शाही विवाह सोहळा उद्या (ता. ०३) पार पडणार आहे. तब्बल १०० एकर परिसरात भव्य तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, राजकीय नेते आणि संत-महंतांची उपस्थिती अपेक्षित असून, गगनगिरी महाराज सप्ताहाने सोहळ्याची सुरुवात होईल. साधेपणाचा संदेश देणाऱ्या इंदुरीकर महाराजांचा हा भव्य विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा : श्रीगोंद्यात ज्युससाठी सडक्या फळांचा वापर; परप्रांतीय दुकानचालकाचे पलायन

सप्ताहाच्या ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात

गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर किर्तन आणि विवाह सोहळा पार पडणार आहे. अनेक राजकीय दिग्गज आणि संत-महंतांची या विवाहासाठी उपस्थिती अपेक्षित आहे. एकीकडे कीर्तनातून लोकांना साधेपणाचा संदेश देणारे इंदोरीकर महाराज आता विवाहामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.

हेही वाचा : खड्ड्यात साचलेल्या पाण्याने अंघोळ भर रस्त्यात ‘गांधीगिरी’ आंदोलन

विवाह सोहळा चर्चेचा विषय (Indorikar Maharaj)

साध्या पद्धतीने लग्न करण्याचा संदेश देणारे इंदोरीकर महाराज आता स्वतःच चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या कन्येच्या भव्य साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. दरम्यान, इंदोरीकर महाराजांनी स्वतःच साखरपुड्यापेक्षा लग्न अधिक भव्य करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आता उद्या होणाऱ्या या विवाहसोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. साधेपणाचा संदेश देणाऱ्या इंदुरीकर महाराजांचा हा भव्य विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.