Theft : एमएसईबी सबस्टेशन चोरी प्रकरणी तिघे जेरबंद; ५ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Theft : एमएसईबी सबस्टेशन चोरी प्रकरणी तिघे जेरबंद; ५ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0
Theft : एमएसईबी सबस्टेशन चोरी प्रकरणी तिघे जेरबंद; ५ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Theft : एमएसईबी सबस्टेशन चोरी प्रकरणी तिघे जेरबंद; ५ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Theft : नगर : शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील एमएसईबी सबस्टेशनमध्ये झालेल्या जबरी चोरी (Theft) प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) तीन आरोपींना अटक करत तब्बल ५ लाख ७२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. भिमा लक्ष्मण म्हस्के (वय ३८), अविनाश कल्याण धुरंधरे (वय ३७) व अमोल गणेश रांजवण (वय ३६, सर्व रा. बीड), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती

ट्रान्सफॉर्मरची तोडफोड ९८ हजारांचा ऐवज लंपास

या बाबत माहिती अशी की, २२ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी चापडगाव येथील एमएसईबी सबस्टेशनमध्ये घुसून वॉचमन गोकुळ संपत मडके (रा. गदेवाडी, ता. शेवगाव) यांना लाकडी दांडके व गजाने मारहाण केली. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून त्यातील सुमारे ९९० लिटर ट्रान्सफॉर्मर ऑइल व ५३० किलो कॉपर कॉईल असा सुमारे ९८ हजार २० रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई(Theft)

गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. तपासादरम्यान हा गुन्हा भिमा लक्ष्मण म्हस्के (रा. बीड) व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शेवगाव शहराजवळील वरुर चौक येथे सापळा रचून संशयित वाहन अडवण्यात आले.

यावेळी भिमा लक्ष्मण म्हस्के (वय ३८), अविनाश कल्याण धुरंधरे (वय ३७) व अमोल गणेश रांजवण (वय ३६, सर्व रा. बीड) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कारची झडती घेतली असता १० किलो कॉपर कॉईल, तीन मोबाईल, चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण ५ लाख ७२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


दरम्यान, चौकशीत आरोपींनी चापडगाव येथील जिनिंग प्रेसमधील डी.पी. फोडून कॉपर कॉईल चोरी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात आणखी दोन साथीदारांचा सहभाग उघड झाला असून त्याबाबत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य आरोपी भिमा म्हस्के हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर राज्यभरात ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.