HSC Result : नगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा नगर जिल्ह्याचा निकाल ९०.३२ टक्के लागला आहे. त्यात मुलांपेक्षा मुलींचा निकाल अधिक असल्याची परंपरा याहीवर्षी कायम राहिली. बारावीच्या परीक्षेत मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.५५ टक्के तर मुलांची टक्केवारी ८६.७४ टक्के आहे.
हेही वाचा : श्रीगोंद्यात ज्युससाठी सडक्या फळांचा वापर; परप्रांतीय दुकानचालकाचे पलायन
ऑनलाईन निकाल जाहीर
राज्य परीक्षा मंडळातर्फे बारावीचा निकाल आज (ता. ०२) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यावर्षी बारावीची परीक्षा ३१ हजार ९२४ मुले व २६ हजार ९७१ मुली अशा एकूण ५३ हजार १९६ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातून २७ हजार ६९४ मुले (८६.७४ टक्के) व २५ हजार ५०२ मुली (९४.५५ टक्के) असे एकूण ५३ हजार १९६ विद्यार्थी (९०.३२ टक्के) उत्तीर्ण झाले.
नक्की पहा : आमदार रोहित पवारांकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवास्थानांच्या कामाची पाहणी
शाखानिहाय निकाल (HSC Result)
जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक लागला असून त्याखालोखाल वाणिज्य आणि कला शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाखानिहाय निकालाची टक्केवारी : विज्ञान, (९६.५५) वाणिज्य, (८५.२६) कला (७५.५९) मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकाल सुमारे ४ टक्क्यांनी वाढला आहे.



