Gas Cylinder : पाथर्डी गॅस टाकी न दिल्याच्या कारणावरून एजन्सीवर धिंगाणा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gas Cylinder : पाथर्डी गॅस टाकी न दिल्याच्या कारणावरून एजन्सीवर धिंगाणा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
Gas Cylinder : पाथर्डी गॅस टाकी न दिल्याच्या कारणावरून एजन्सीवर धिंगाणा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Gas Cylinder : पाथर्डी गॅस टाकी न दिल्याच्या कारणावरून एजन्सीवर धिंगाणा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gas Cylinder : पाथर्डी : तालुक्यातील करंजी येथील भारत गॅस (Bharat Gas) एजन्सीवर गॅस टाकी (Gas Cylinder) न दिल्याच्या कारणावरून दोघांनी धिंगाणा घालत एजन्सी मालक व कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्त्यावर दगड टाकून रस्ता अडवला

याबाबत उर्मिला सदानंद कर्षे (वय 56, रा. पवननगर, भिस्तबाग, सावेडी, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्या करंजी येथे भारत गॅस एजन्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. एजन्सीच्या कामकाजासाठी त्यांच्याकडे तीन कामगार कार्यरत आहेत. दि. २ मे २०२६ रोजी दुपारी उर्मिला कर्षे या त्यांच्या मुलगा विक्रात कर्षे व कामगारांसह एजन्सीवर असताना ज्ञानेश्वर बाबासाहेब घोरपडे हा तेथे आला. त्याने गॅस टाकीची मागणी केली. मात्र टाक्या संपल्याने सोमवारी देण्याचे सांगितल्यावर त्याला राग आला. त्याने उर्मिला कर्षे व त्यांच्या कामगारांना शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर काही वेळातच ज्ञानेश्वर घोरपडे व त्याचा भाऊ बाळासाहेब बाबासाहेब घोरपडे हे दोघे हातात लाकडी दांडे घेऊन पुन्हा एजन्सीवर आले. त्यांनी पुन्हा शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच एजन्सीच्या गोडाऊनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकून रस्ता अडवून ठेवला. या प्रकारामुळे एजन्सीचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले.

यांच्या विरोधात गुन्हा दाखल (Gas Cylinder)

याप्रकरणी उर्मिला कर्षे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर बाबासाहेब घोरपडे व बाळासाहेब बाबासाहेब घोरपडे (दोघे रा. वैजु बाभुळगाव, ता. पाथर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.