Nikhil Ware : अहिल्यानगरमध्ये पाणीपुरवठ्याचा बोजवारा; नगरसेवक निखिल वारे आक्रमक

Nikhil Ware : अहिल्यानगरमध्ये पाणीपुरवठ्याचा बोजवारा; नगरसेवक निखिल वारे आक्रमक

0
Nikhil Ware : अहिल्यानगरमध्ये पाणीपुरवठ्याचा बोजवारा; नगरसेवक निखिल वारे आक्रमक
Nikhil Ware : अहिल्यानगरमध्ये पाणीपुरवठ्याचा बोजवारा; नगरसेवक निखिल वारे आक्रमक

Nikhil Ware : नगर : शहरासह उपनगरांमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा (Water Supply) पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गरज वाढलेली असताना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती

ठोस उपाययोजना करण्याची मागणी

या संदर्भात नगरसेवक निखिल वारे (Nikhil Ware), नगरसेवक महेश लोंढे (Mahesh Londhe), सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बोरुडे, रोहन फडतरे यांच्यासह नागरिकांच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांना निवेदन देण्यात आले. पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती (Nikhil Ware)

सध्या वीज वितरणातील अडचणी, भारनियमन तसेच नियोजनाचा अभाव यामुळे शहरात वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून त्यांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
दरम्यान, पाणीपुरवठ्याबाबत माहिती घेण्यासाठी संबंधित वॉलमनशी संपर्क साधल्यास उडवाउडवीची व उध्दट उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

या संपूर्ण प्रकारामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसत असून त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.