Caught smoking: संगमनेर: नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळील परिसरात मंगळवारी (ता.५) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई (Big action) केली. एका टेम्पोतून अवैधरित्या वाहतूक केला जाणारा लाखो रुपयांचा गुटखा पकडला (Caught smoking) असून, या प्रकरणी परराज्यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अवश्य वाचा- हुंड्यासाठी छळ; विवाहितेने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन, राहाता तालुक्यातील घटना
स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाची कारवाई (Caught smoking)
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तरीत्या केली असून या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. नाशिकहून पुण्याच्या दिशेने एका टेम्पोमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी टोलनाका परिसरात सापळा रचला. संशयास्पद टेम्पोची झडती घेतली असता, त्यात गोण्यांमध्ये भरलेला लाखो रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू आणि गुटखा आढळून आला. या प्रकरणी टेम्पोतील तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, ते राजस्थान आणि उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रात गुटखाबंदी असतानाही छुप्या मार्गाने होणाऱ्या या तस्करीवर या कारवाईमुळे मोठा लगाम बसला आहे. या गुटख्याचा मुख्य मालक कोण आणि हा साठा कोठे पोहोचवला जाणार होता? हे देखील पोलिस तपासात समोर येईल.



