Suicide : हुंड्यासाठी छळ; विवाहितेने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन, राहाता तालुक्यातील घटना

वडीलांच्या राहत्या घराजवळील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली

0
Suicide : हुंड्यासाठी छळ; विवाहितेने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन, राहाता तालुक्यातील घटना
Suicide : हुंड्यासाठी छळ; विवाहितेने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन, राहाता तालुक्यातील घटना

Suicide : राहाता : पैशांची हाव माणसाला किती क्रूर बनवू शकते, याचा धक्कादायक प्रत्यय राहाता तालुक्यात आला आहे. घराच्या बांधकामासाठी माहेरून चार लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत एका २३ वर्षीय विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ (Mental Harassment) करून तिला आत्महत्येला (Suicide) प्रवृत्त केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. प्रिया शुभम ढगे असे या विवाहितेचेनाव असून, याप्रकरणी पती, सासरा आणि सासू यांच्याविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात (Rahata Police Station) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्र शासनाच्या निवृत्ती वेतनधारकांची बैठक

सासरच्या मंडळींकडून सतत छळ

मिळालेल्या माहितीनुसार मे २०२४ पासून ते ३ मे २०२६ पर्यंत सासरच्या मंडळींकडून प्रियाचा सतत छळ सुरू होता. घराचे बांधकाम करायचे आहे, तुझ्या बापाकडून ४ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत सासरच्यांनी प्रियाला वेळोवेळी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि इतकेच नव्हे तर तिला अनेकदा उपाशीपोटी ठेवून तिचा छळ केला. सासरच्या या अमानुष त्रासाला कंटाळून अखेर प्रियाने राहाता तालुक्यातील एकरुखे येथे वडीलांच्या राहत्या घराजवळील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

राहाता तालुक्यात संताप व्यक्त (Suicide)

तीने आपल्या मोबाईल वरुन घरच्यांना केलेल्या व्हॉट्स्ॲप मेसेज मध्ये तीला कसा त्रास दिला जात होता हे ही घरच्यांना सांगीतले होते. अनिल बाळासाहेब बोर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहाता पोलिसांनी आरोपी शुभम राजेंद्र ढगे (पती) राजेंद्र आबासाहेब ढगे (सासरे) प्रतिभा राजेंद्र ढगे (सासू) (सर्व रा. को-हाळे, ता. राहाता) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत करत आहेत. ऐन तारुण्यात एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून जीव दिल्याने संपूर्ण राहाता तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.