Pensioners : महाराष्ट्र शासनाच्या निवृत्ती वेतनधारकांची बैठक

सेवानिवृत्तांच्या समस्या सोडविण्यासाठी सेवानिवृत्तांनी संघटीत होणे गरजेचे

0
Pensioners : महाराष्ट्र शासनाच्या निवृत्ती वेतनधारकांची बैठक
Pensioners : महाराष्ट्र शासनाच्या निवृत्ती वेतनधारकांची बैठक

Pensioners : राहाता : महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना (Maharashtra State Active Retired Officers and Employees Association) पुणे या संघटनेची बैठक नुकतीच शारदा विद्या मंदीर (Sharada Vidya Mandir) राहाता या ठिकाणी निवृत्त सहकार अधिकारी रमेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता व सहसचिव मनोहर पोकळे म्हणाले की, सरकारी सेवेतून निवृत्त (Retired) झालेल्या कृतिशील व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्या दीर्घ सेवेतील अनुभवाचा लाभ सामान्य नागरिकांना मिळावा व त्यांच्या स्वत:च्या प्रकृती स्वास्थ्यासाठी ते कार्यरत रहावेत. या उद्देशाने कृतिशील निवृत्त अधिकारी, कर्मचारी मध्यवर्ती संस्था कार्यरत झाली आहे.

नक्की वाचा : चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा वाढीव गस्त, सीसीटीव्ही, नाकाबंदीवर भर

सर्वच जिल्ह्यात संघटनेचे काम सुरु

संघटनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असुन जवळपास सर्वच जिल्ह्यात संघटनेचे काम सुरु झाले आहे. सेवानिवृत्तांचे निवृत्तीवेतन विषयक प्रश्न सोडविणे, त्यांच्या सुरक्षिततेची व स्वास्थ्याची काळजी घेणे ही कामे संघटनेमार्फत प्राधान्याने करण्यात येत आहेत. तसेच संघटना सेवानिवृत्त व जेष्ठांसाठी आरोग्य तपासणी तसेच व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्र, संमेलने आयोजित करणे, सभासदांचे हितसंबंध वृधींगत व्हावेत या व अशा विविध बाबींच्या दृष्टीने सामाजिक बांधीलकी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. नोकरांसाठी जीवन जगण्याच्या निर्देशांकावर वेतनश्रेणी ठरविली जाते. त्यासाठी समिती नेमुन निर्णय घेतला जातो. जगातील लोकसंख्येच्या 1.25 टक्के लोकांनाच निवृत्ती वेतन मिळते. आता जवळपास 20 देशांत तेथील शासनाने निवृत्ती वेतन देणे बंद केले आहे. यासाठीच सेवानिवृत्तांच्या समस्या सोडविण्यासाठी सेवानिवृत्तांनी संघटीत होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

निवृत्त अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित (Pensioners)

याप्रसंगी बी.जी. निर्मळ म्हणाले की, संघटनेत काम करणारे लोक चळवळीतील असून निवृत्तांनी समाजाभिमुख काम करणे आवश्यक आहे. भविष्यातील आव्हानांसाठी सर्वांनीच एकत्र येणे गरजेचे आहे. यावेळी सर्जेराव मते यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले, तर जी.टी. गमे यांनी आभार मानले.

या बैठकीस वित्त विभागाचे निवृत्त उपसंचालक बी.जी. निर्मळ, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त निवृत्त मुख्याध्यापक सर्जेराव मते, जलसंपदा विभागाचे निवृत्त वरिष्ठ लिपीक पंढरीनाथ काकडे, सेवानिवृत्त प्राचार्य जी.टी. गमे, निवृत्त अभियंता एस.टी. घुले, एस.के. थोरात, भास्कर झावरे, बाळासाहेब निर्मळ, मनोहर बोरुडे, नामदेव गाडेकर, गणेशचे संचालक नानासाहेब नळे, हरिश्चंद्र चौधरी, नानासाहेब गाडेकर, मंडलिक शिलेदार, शिवमुर्ती गोसावी, भिवसेन गाडेकर, भाऊसाहेब मेहेत्रे, माधव घाडगे, रेवणनाथ बनकर, भाऊसाहेब कापसे, भास्कर गमे, चंद्रशेखर कुलकर्णी, शब्बीर पटेल, बाळासाहेब नरोडे, जवाहर तारगे, अरुण पानसरे, चांगदेव गमे, विट्ठल महाले, भागवत भोसले, दत्तात्रय बागुल, सुरेश बडदे, काशिनाथ फंड, सुभाष आवारे, बी.ए.बांगर, एस.डी. नलगे यांच्यासह निवृत्त अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.