Chain Snatching : चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा वाढीव गस्त, सीसीटीव्ही, नाकाबंदीवर भर

Chain Snatching : चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा वाढीव गस्त, सीसीटीव्ही, नाकाबंदीवर भर

0
Chain Snatching : चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा वाढीव गस्त, सीसीटीव्ही, नाकाबंदीवर भर
Chain Snatching : चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा वाढीव गस्त, सीसीटीव्ही, नाकाबंदीवर भर

Chain Snatching : नगर : अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंगच्या (Chain Snatching) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सकाळच्या वेळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने किंवा मॉर्निंग वॉकदरम्यान महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police Station) महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक ॲक्शन प्लॅन (Action Plan) तयार केला आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती

दागिन्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन

योजने अंतर्गत पोलिसांचे पथक गार्डन, मोकळी मैदाने, मंदिर परिसर, तसेच भाजी मंडई याठिकाणी भेट देऊन महिलांमध्ये जनजागृती करणार आहे. गर्दीच्या ठिकाणी कोणते दागिने वापरावेत, दागिन्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलीस गस्त वाढवली

सकाळी फिरताना महिलांनी जास्त दागिने न घालण्याचा सल्ला देण्यात आला असून, दागिने घातल्यास ते स्कार्फने झाकून ठेवावेत, असेही सांगितले जात आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शक्यतो बनावट दागिन्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील वर्दळीच्या भागांमध्ये तसेच सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मार्गावर पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. दुचाकीवरील बीट मार्शल संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये, सिग्नल्सवर आणि सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणांनाही यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय, शहराच्या प्रमुख प्रवेशद्वारांवर आणि मुख्य रस्त्यांवर अचानक नाकाबंदी करून संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. विशेषतः नंबर प्लेट नसलेल्या दुचाकींवर पोलिसांचे लक्ष केंद्रित आहे.