Coyote attack: पाथर्डी: तालुक्यातील मुंगूसवाडे येथील एका हॉटेल मालकाला जिवे मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्याने फायरिंग केल्याची आणि कोयत्याने गळ्यावर वार (Coyote attack) केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपींनी हॉटेलची तोडफोड करून पाच हजार रुपये लुटले. मात्र, पाथर्डी पोलिसांनी घटनेच्या एक तासाच्या आत एका आरोपीला पकडले आणि त्याच्याकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. आज (ता.६) दुपारी १२.४० वाजता ही घटना घडली.
अवश्य वाचा- महाराष्ट्र शासनाच्या निवृत्ती वेतनधारकांची बैठक
गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे हस्तगत (Coyote attack)
फिर्यादी शक्तीमान महादेव खेडकर यांच्या हॉटेलमध्ये परशुराम मोहन गायकवाड, करण भरत जाधव, विठ्ठल सखाराम लष्करे (रा. वाघोली, पुणे, मूळ रा. गांधीनगर, बौड) व दोन अनोळखी इसम आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पाथर्डी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ पथक रवाना केले. पोलीस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विशाल लहाने, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन दराडे, बाबासाहेब बडे, सागर बुधवंत, ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव, इजाज सय्यद यांच्या पथकाने आरोपी विठ्ठल सखाराम लष्करे याचा पाठलाग करत त्याला एका तासाच्या आत जेरबंद केले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.



