Nilesh Lanke : खासदार निलेश लंके पुढील उपचार आणि रुटीन तपासण्यांसाठी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल

Nilesh Lanke : खासदार निलेश लंके पुढील उपचार आणि रुटीन तपासण्यांसाठी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल

0

Nilesh Lanke : नगर : सततचे सार्वजनिक कार्यक्रम आणि कडाक्याच्या उन्हातील धावपळीमुळे प्रकृती (Health) अस्वस्थ जाणवू लागल्याने, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना पुढील उपचार आणि रुटीन तपासण्यांसाठी आज पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले आहे.

नक्की वाचा: हुंड्यासाठी छळ; विवाहितेने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर

गेल्या दोन-चार दिवसांपासून खासदार लंके यांची प्रकृती काहीशी नरम होती. त्यामुळे खबरदारी म्हणून आणि शरीरातील थकवा लक्षात घेता, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या काही रुटीन तपासण्या करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना काही दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचे सांगण्यात आले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

लवकरच पुन्हा सेवेत पूर्ण क्षमतेने उपस्थित होईन (Nilesh Lanke)

आपल्या तब्येतीबाबत माहिती देताना खासदार लंके यांनी कळवले आहे की, “रुटीन तपासण्या आणि योग्य उपचारांनंतर मी लवकरच पुन्हा एकदा आपल्या सेवेत पूर्ण क्षमतेने उपस्थित होईन. जनतेचे आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे कुणीही काळजी करू नये., उपचार आणि विश्रांती पूर्ण करून खासदार लंके लवकरच अहिल्यानगरमध्ये पुन्हा सक्रिय होतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.