Accident : मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाचा अपघातात मृत्यू

अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली

0
Accident : मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाचा अपघातात मृत्यू
Accident : मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाचा अपघातात मृत्यू

Accident : पाथर्डी : तालुक्यातील मोहटे येथील बाजीराव नाना शिंदे (वय ५७) यांचा कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू (death) झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ८) पहाटे घडली. पाथर्डी–बीड राज्य महामार्गावर (Pathardi–Bed State Highway) मोहटे गावाजवळील रेणुका विद्यालयापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर मोहटे शिवारात हा भीषण अपघात (accident) झाला.

नक्की वाचा : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाचा ऑस्ट्रेलिया दौरा

अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, बाजीराव शिंदे हे शुक्रवारी (ता. ८) पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, वाहनातील प्रवासी हे वाशी (मुंबई) येथून पाथर्डी मार्गे बीडकडे परीक्षा देण्यासाठी जात होते. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

घटनास्थळी नागरिकांचा जमाव उग्र (Accident)

बाजीराव शिंदे हे खाजगी चारचाकी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांचा जमाव उग्र झाला होता.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कानडे, धनराज चाळक व कानिफनाथ गोफणे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास गायकवाड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here