
Chief Minister’s Prosperous Panchayat Raj Campaign : पाथर्डी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत (Chief Minister’s Prosperous Panchayat Raj Campaign) पाथर्डी तालुक्यातील धनगरवाडी (Dhangarwadi) येथे अभियानातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या समिती सदस्यांचे (Committee member) ग्रामस्थांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले. गावातील विविध विकासकामांची पाहणी करत समितीने समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले.
नक्की वाचा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाचा अपघातात मृत्यू

२० गावांनी नोंदवला सहभाग
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात पाथर्डी तालुक्यातील २० गावांनी सहभाग नोंदवला असून या गावांच्या मूल्यांकनासाठी बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील समिती दाखल झाली आहे. बुधवारी (ता. ६) सकाळी समितीने धनगरवाडी गावाला भेट देऊन अभियान कालावधीत राबविण्यात आलेल्या आठ घटकांतील विकासकामांची पाहणी केली.समितीत गटविकास अधिकारी कैलास बलवंत, विस्तार अधिकारी अशोक सावध, समिती सदस्य राहुल दुबे, अक्षय कांबळे व अक्षय गायकवाड यांचा समावेश होता. समिती गावात दाखल होताच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर समितीने ग्रामपंचायतीची अभिलेखे, विकासकामांची माहिती व विविध उपक्रमांची पाहणी केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित (Chief Minister’s Prosperous Panchayat Raj Campaign)
पाहणीदरम्यान समिती प्रमुखांनी ग्रामपंचायत अधिकारी गोपीचंद रोंढे यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. गावात एकजूट आणि प्रामाणिकपणे काम करणारे कर्मचारी असतील तर गावाचा कायापालट होऊ शकतो, हे धनगरवाडीने दाखवून दिले आहे असे मत समिती सदस्यांनी व्यक्त केले.अभियानात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल ग्रामपंचायत कर्मचारी राजू राठोड, मच्छिंद्र चितळे व ईश्वर गाढे यांचा समितीच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच हिराबाई चितळे, उपसरपंच किशोर राठोड, अशोकर गाढे, रंगनाथ महाराज, नरहरी महाराज, सखाराम पवार, गंगाधर गाढे, प्रल्हाद चितळे, हनुमान जिवडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


