Rahuri News : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक;राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Rahuri News : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक;राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Rahuri News : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक;राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर: ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली तब्बल ११ लाख रुपयांचा चुना (Fraud of ₹11 Lakhs) लावून एका व्यक्तीची आर्थिक फसवणूक झाल्याची मोठी घटना राहुरीतून (Rahuri News) उघडकीस आली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा (Rahuri Police Station) दाखल करण्यात आला आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊ…

नक्की वाचा: तलाठी भरतीची परीक्षा आता MPSC घेणार, जाहिरात कधी निघणार?

नेमकं प्रकरण काय? (Rahuri News)

दिलीप नवनाथ ढोकणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या एका नातेवाईकाने लक्ष्मण उखा चव्हाण हा व्यक्ती उसतोडीसाठी मजूर उपलब्ध करून देतो, अशी माहिती दिली, ही माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीशी संपर्क साधला. त्यानुसार ६ जुलै २०२४ ला उंबरे येथे झालेल्या बैठकीत सन २०२४-२५ गाळप हंगामासाठी ९ बैलगाड्यांवर  १८ पुरुष व १८ महिला असे एकूण ३६ उसतोड मजूर पुरवण्याचा करार झाला. प्रत्येक बैलगाडीमागे १ लाख २५ हजार रुपये देण्याचे ठरले. यावेळी फिर्यादी यांनी आरोपीला २० हजार रुपये रोख अॅडव्हान्स दिले. त्यानंतर ११ जुलै २०२४ रोजी आरोपीच्या सेंट्रल बँक खात्यावर १ लाख रुपये पाठविण्यात आले.

अवश्य वाचा: ‘रामायणम्’ मधील पुष्पक विमान इतके अप्रतिम का ठरत आहे? जाणून घ्या सविस्तर…

५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार (Rahuri News)

पुढे १५ जुलै २०२४ ला ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून उसतोड मजूर पुरवठ्याबाबत अधिकृत करार करण्यात आला. या करारात अंबालिका शुगर प्रा.लि. कर्जत कारखान्यासाठी मजूर पुरवठ्याच्या अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या. फिर्यादी तसेच कारखान्याचे कर्मचारी आरोपीच्या गावी जाऊन हे सगळे मजूरही पाहून आले होते. त्यामुळे आरोपीवर विश्वास बसल्याने फिर्यादी यांनी वेळोवेळी फोनपे व आरटीजीएस द्वारे आरोपीच्या खात्यावर पैसे पाठविले.

१३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत एकूण १० लाख ८० हजार रुपये ऑनलाइन तसेच २० हजार रुपये रोख, असे मिळून ११ लाख रुपये या आरोपीला देण्यात आले. मात्र त्यानंतर या व्यक्तीने मजूर तयार असल्याचे सांगून फिर्यादी यांना ट्रक घेऊन धुळे जिल्ह्यातील मोरदंड तांडा येथे बोलावले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी तो बाहेरगावी गेल्याचे सांगितल. आरोपीचा मोबाईलही बंद लागत असल्याने फिर्यादींना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर संपर्क साधल्यावर आरोपीने पैसे परत देण्याचे आश्वासन दिले, मात्र आजपर्यंत कोणतीही रक्कम परत केली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी धुळे जिल्ह्यातील मोरदंड येथे राहणाऱ्या आरोपी लक्ष्मण उखा चव्हाण, याच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.