Accused Arrested : सांगवीतील घरफोडी उघड; सराईत चोरट्यासह १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

संशयित आरोपीने चोरीतील काही दागिने स्वतःच्या राहत्या घरात लपवून ठेवले होते, तर काही दागिने सराफ व्यावसायिकाला विकल्याची माहिती

0
Accused Arrested : सांगवीतील घरफोडी उघड; सराईत चोरट्यासह १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Accused Arrested : सांगवीतील घरफोडी उघड; सराईत चोरट्यासह १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Accused Arrested : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी येथे दिवसा घरफोडी (Burglary) करून लाखो रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने अटक (Accused Arrested) केली. आरोपीकडून तब्बल १६ लाख ५९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत नितीन दत्तात्रेय जाधव याला ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी हा रेकॉर्डवरील असून त्याच्याविरोधात बारामती, इंदापूर, यवत, पंढरपूर तसेच गेवराई पोलीस ठाण्यात घरफोडी व जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल पोलीस तपासात समोर आले आहे.

नक्की वाचा : ‘एक दिवस, एक गाव भेट’; अहिल्यानगर तालुका पोलिसांचा जनसंपर्क उपक्रम

२९ एप्रिलला गुन्हा दाखल

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात २९ एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी सतीश उत्तमराव भोईटे, रा. सांगवी, ता. श्रीरामपूर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ५ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे तसेच फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, मनोज साखरे, भगवान थोरात, रमिझराजा आतार आणि महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास (Accused Arrested)

पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान हा गुन्हा नितीन दत्तात्रय जाधव (वय ४०, रा. संजयनगर, गेवराई, जि. बीड, सध्या रा. हनुमाननगर, दौंड रोड, अहिल्यानगर) याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

सोन्याचे दागिने हस्तगत

संशयित आरोपीने चोरीतील काही दागिने स्वतःच्या राहत्या घरात लपवून ठेवले होते, तर काही दागिने सराफ व्यावसायिकाला विकल्याची माहिती तपासात समोर आली. पोलिसांनी आरोपीच्या घरातून ८ लाख २३ हजार २६० रुपये किमतीचे ७७ ग्रॅम ६२० मिली वजनाचे सोन्याचे दागिने तसेच ४० हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप हस्तगत केले. याशिवाय संबंधित सराफ व्यावसायिकाकडून ८ लाख ३६ हजार रुपये किमतीचे ७० ग्रॅम ३९० मिली सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

नितीन जाधववर घरफोडी व जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल

या कारवाईत एकूण १६ लाख ५९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये १४८ ग्रॅम १० मिली सोन्याचे दागिने आणि दोन लॅपटॉपचा समावेश आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेला नितीन जाधव हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरोधात बारामती, इंदापूर, यवत, पंढरपूर तसेच गेवराई पोलीस ठाण्यात घरफोडी व जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आली आहे.