Balasaheb Thorat : विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवी : बाळासाहेब थोरात

महाराष्ट्राच्या विचारधारेला धक्का देणाऱ्यांना शासन पाठीशी घालते हे दुर्दैव

0
Balasaheb Thorat : विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवी : बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat : विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवी : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : संगमनेर : वारकरी संप्रदायाचा (Warkari Tradition) विचार हा सर्वांना समवेत घेऊन जाणारा मानवतेचा विचार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी अशा कठीण काळात हा विचार पुढे नेण्यासाठी धीरोदत्तपणे सामोरे जाण्याची शिकवण दिली. विकास लवांडे (Vikas Lavande) यांच्यावरील झालेला भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली आहे.

नक्की वाचा : साखरपुड्यातील १७ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड; मध्यप्रदेशातून मुद्देमाल हस्तगत

लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी

संत परंपरेचा समतेचा विचार सांगणारे विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे यांनी आळंदी येथे शाईफेक हल्ला केला या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, या हल्ल्याला ते धीरोदत्तपणे सामोरे गेले आहे. संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी अशा कठीण काळात आपला विचार जोपासण्यासाठी धीरोदत्तपणे सामोरे जाण्याची शिकवण आपल्याला दिली आहे. हा विचार पुढे घेऊन जाताना पुरोगामी महाराष्ट्रात विचार मांडणाऱ्यांवर होणारे हल्ले हे चिंताजनक आहे. यापूर्वी प्रवीण गायकवाड, हनुमंत पवार यांच्यावरही असे हल्ले झाले. आणि आता विकास दादा लवांडे यांच्यावर ही हल्ला झाला आहे. झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विचार न मांडता हल्ला करणे ही अत्यंत चुकीची पद्धत (Balasaheb Thorat)

खरे तर प्रतिवाद करायला त्यांना संधी आहे. ते सांगू शकतात की आमचे वारकरी विचार असे आहेत. आणि त्यांनी ते सांगितले पाहिजे. मात्र, तसे न करता हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. दुर्दैवाने शासन त्यांना पाठीशी घालते आहे हे वाईट आहे. महाराष्ट्राच्या विचार झालेला धक्का लावणाऱ्यांना सरकारने पाठीशी घालत आहे. वारकरी संप्रदायातील सर्वांनी अत्यंत जागृतपणे या घटनेकडे अत्यंत जाणीवपूर्वक पाहिले पाहिजे. विचारातून प्रतिवाद करा. पण प्रतिवाद न करता, विचार न मांडता हल्ला करणे हे अत्यंत चुकीची पद्धत आहे . आणि अशा लोकांना शासन पाठीशी घालते हे दुर्दैवाचे असल्याचे टीका मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे..