Government service: गावातच मिळत आहेत शासकीय सेवा; नागरिकांचा मानसिक ताण होतोय कमी

विविध विभागांची कामे एकाच व्यासपीठावर

0

Government service: पाथर्डी: समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना गावपातळीवर विविध शासकीय सेवा (Government service) व योजनांचा लाभ वेळेत मिळत असून त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. तालुक्यातील टाकळीमानुर येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज स्व समाधान शिबिरा’त त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, भाजप तालुकाध्यक्ष धनंजय बडे, युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शुभम गाडे, नायब तहसीलदार किशोर सानप, रवींद्र शेकटकर, नानासाहेब गाडे, डॉ. विजय किसवे, वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक शेषराव ढाकणे, भाजप उपाध्यक्ष आप्पासाहेब शिरसाठ, जगन्नाथ महारनोर, पोपटराव शिरसाठ, सतीश मनोत, हरिभाऊ दहिफळे, कृष्णा गाडे आदी उपस्थित होते.शिबिरात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे, ट्रॅक्टर तसेच आरोग्य पेटीचे वितरण करण्यात आले.

अवश्य वाचा- साखरपुड्यातील १७ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड; मध्यप्रदेशातून मुद्देमाल हस्तगत

विविध विभागांची कामे एकाच व्यासपीठावर (Government service)

यावेळी बोलताना आमदार राजळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियोजनानुसार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर राबविण्यात येत आहे. विविध विभागांची कामे एकाच व्यासपीठावर होत असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळत आहे. ग्रामीण भागातील गरजूंना अधिकाधिक शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री महामुनी, स्वाती आव्हाड, अपेक्षा गडदे, अनिल धोत्रे, रवींद्र गाडेकर आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी केले. सूत्रसंचालन शामसुंदर गुंजकर यांनी तर आभार नायब तहसीलदार रवींद्र शेकटकर यांनी मानले.